आमच्या बद्दल

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमीभाव मिळवून देणारी डिजिटल बाजारपेठ -कृषीक्रांती

 

शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे.

आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो.त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.

शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाइट बाजारात आली आहे. तीचे नाव आहे कृषिक्रांती (www.krushikranti.com )
या वेबसाइटचा वापर करून शेतकरी आपल्या कृषी मालाची मोफत जाहिरात करू शकतो व आपल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. धान्य,फळ,भाज्या,जमीन,शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींची जाहिरात आता शेतकरी मोफत करू शकतो आणि पाहिजे ती सामुग्री मिळवू शकतो.
या वेबसाइटचा वापर फक्त शेतकऱ्यांनाच होणार आहे असेही नाही. शेतमालाचा व्यवहार करणारे व्यापारी, शेतीपूरक साहित्याचे विक्रेते, दलाल देखील या वेबसाइटचा वापर करू शकतात.जर शेतकरी जाहिरात करत असेल तर याचा फायदा हा व्यापारी वर्गालाही होईल. जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसाइटवर जाहिरात पाहून तो माल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाइटचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल.
किरकोळ शेतीमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतीमालाची जाहिरात वेबसाइटवर करू शकतात.जेणे करून शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाइटवर पाहून ठरवू शकतो.व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.

बोलकी आकडेवारी

4800 +
वापरकर्ते
+
जाहिराती
+
उत्पादन वर्ग
5/5
“ शेतकऱ्यांची परिस्थिती आज ‘ काम करे बंदर और दाम खाये मदारी’ अशी झाली आहे. कृषी क्रांती शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा आणि त्यांचा माल थेट ग्राहका पर्यंत पोहोचावा यासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा ”
अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक

कृषी क्रांती

कृषी सेवेत सदैव तत्पर

आम्ही विविध शेतमाल उत्पादनांच्या जाहिराती करतो!

 • डेअरी
 • खते
 • फुले
 • फळे
 • धान्य
 • जमीन
 • नर्सरी
 • सेंद्रिय
 • पशुधन
 • बियाणे
 • भाज्या

आमची टीम

संदीप नवनाथ नाकाडे
Operational Manager
प्रा. किरण अरुण सुपेकर​
Director and Founder
Open chat
1
कृपया आपला जिल्हा पाठवा व हा नंबर krushi kranti नावाने सेव्ह करा तरच तुम्हाला आपल्या कृषीक्रांतीचे मेसेज येतील
Powered by