Search
Generic filters

सर्व पिकांना उपयुक्त असे बायो ग्रोमीन…!

सर्व पिकांना उपयुक्त असे बायो ग्रोमीन...!

सविस्तर माहिती

सर्व पिकांना उपयुक्त असे बायो ग्रोमीन…!

 

भारत हा कृषि प्रधान देश आहे. शेती हा आपला परंपरागत व्यवसाय असून आपला शेतकरी दिवसभर काबाड कष्ट करुन शेतीची मशागत, पेरणी व पिकांचे संगोपन यासाठी विविध रासायनिक खंताचा वापर करत असून रासायनिक खते, औषधे आणि मजुरी यांचे वाढलेले आमाप भाव यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसून शेतकरी सुखी आणि समाधानी नाही. वेळोवेळी तो पिकावर वेगवेगळे औषधे प्रयोग करून त्या पिकाला वाढवण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी पिकांसाठी जी मेहनत घेतो त्यानुसार त्याला पाहिजे तसे परिश्रमाचे फळ भेटत नाही. याचे कारण असे की, रासायनिक खतांच्या वाढलेल्या प्रयोगामुळे जमिनीची रोगप्रतिकार शक्ती व पोषकता नष्ट होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यकतुसार पोषक अन्न मिळाल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर पण गंभीर परिणाम होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही आल्पसा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. शेतकरी सुखी व समाधानी व्हावा यासाठी आम्ही एक बेजोड पिक दर्जा सुधारक संपूर्णतः नैसर्गिक सेंद्रिय उत्पादन तयार केलेले आहे.

बायो ग्रोमीन हे संपूर्णतः नेसर्गिक सेंद्रिय घटकापासुन शास्त्रोक्त पध्दतीने रासायनमुक्त दर्जेदार उत्पादन आहे . बायो ग्रोमीन हे पिकांचे पंचप्राण आहे . हे एकच उत्पादन सर्वच पिकांसाठी पेरणीपासुन ते उत्पादनापर्यंत संपुर्ण कार्य करते. यामध्ये प्रोटीन्स, ऑक्झीन्स, अल्जीनीक, सिव्हीड आणि फुलवीक ऍसिड हे मुख्य घटक अंतर्भुत आहेत बायो ग्रोमीन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक 70 प्रकारचे वेगवेगळे मुलभुत घटक आहेत. वनस्पतीस उपलब्ध स्वरुपात व मुबलक प्रमाणात मिळतात पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आत्यावश्यक असणारे हार्मोन्स , विटामिन्स , बिएटीन , सायटोकायनीन तसेच 17 प्रकारचे अमिनो ऍसिड 6 प्रकारचे सुक्ष्म अन्नद्रव्ये तसेच 6 प्रकारचे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये सर्व मुलभुत घटक एकत्रीत रित्या पिकांना मिळावीत या दृष्टीने संशोधन करून बायो ग्रोमिन या उत्पादनाची

वनस्पतीच्या वाढीमध्ये बायोग्रामीनच्या फवारणीचे महत्व

 1. वनस्पतीतील हरीतलवकांची निर्मिती वाढते.
 2. प्रकाशसंश्लेषण क्रीया गतीशील होऊन अन्ननिर्मितीत वाढ होते.
 3. वनस्पतीची श्वसनाची क्रीया नियमीत करुन पानावाटे ऑक्सिजन शोषणची क्रीया गतीशील होते.
 4. प्रतिकुल वातावरणत उदा . तापमानातील तीव्र बदल, धुके इ . मधे मंद होणारी वनस्पतीची पर्णरंथांची क्रीयाशीलता सुरळतीत राखून चयापचायाची क्रीया गतीशील करते.
 5. वनस्पतीमधील पाण्याचा समतोल राखून अन्नद्रव्यांचे शोषण व वहन गतीशील होते.
 6. वनस्पतीच्या फलोऱ्याच्या अवस्थेमध्ये परागीभवनाचा वेग वाढून फुलांचा परिणामी फळांचा लाग वाढतो.
 7. धातूवर्गीय मुलद्रव्यांना शोषणयोग्य अवस्थेमध्ये रुपांतरीत करुन नैसर्गिकचिलेटींग एजंट म्हणून कार्य करते.
 8. वनस्पतीमधील विविध एन्झाईम्सचा क्रीया नियंत्रीत करुन वनस्पतीची प्रतिकारशक्ती वाढविते .
 9. ऊसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते , प्रतिकुल परिस्थितीत ही ऊसाची वाढ होते , ऊसाची उगवण एकसारखी जोमदार होते व फुटव्यांची संख्या वाढते . ऊसाची पाने हिरवीगार व पेरांची जाडी व लांबीत वाढ होते.

वनस्पतीच्या वाढीमध्ये बायोग्रामीनच्या आळवणीचे महत्व

 • जमिनीतील कार्बन नायट्रोजन ( C : N Ratio ) गुणपत्तराचे प्रमाण नियंत्रणात राहते.
 • जमिनीतील ( Nutrient Cycle ) नत्र, स्फुरद, पालाश, गंधक अशा मुख्य मुलद्रव्यांची देवाण घेवाण सुरळीत ठेवते.
 • जमिनीची Cation Exchange क्षमता वाढविते त्यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांची उपयोगशीलता वाढविते.
 • जमिनीचा क्षारता निर्देशांक ( Salt Index ) नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 • जमिनीचा भौतिक व रासायनिकम संरचनेत ( Soil Texture & Structure ) सुधार होऊन जमिनीचा सामु विद्राव्य क्षारता ( ph & EC ) संतुलित राहण्यास मदत होते.
 • जमिनीची सच्छिद्रता वाढून ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो परिणामी वनस्पतीच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि जमिनीतील वनस्पतींसाठी उपयोगी ठरणाऱ्या जिवाणूची संख्या देखील वाढते. जमिनीचा निचरा होण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊन अपायकारक जिवाणू व बुरशीजन्य रोगांपासून वनस्पतीचे संरक्षण होते .
 • बीयाणांची उगवणक्षमता वाढून बिजांकुरण जलद होण्यास मदत होते .
 • पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुक्ष्म अन्नद्रव्ये ऍमिनो एसिड इ . आवश्यक घटक मुबलक प्रमाणात मिळतात.

वापरण्याचे प्रमाण

 • फवारणीसाठी : 1 ते 2 मि.ली / लिटर पाणी
 • ड्रेचिंग ( आळवणी ) साठी : 2 ते 3 मि.लि. / लिटर पाणी

विक्रेत्यांशी संपर्क:-  9823857786

सुचनाः सदर शिफारशी फक्त निर्देशक आहेत परंतु हवमान, पाणी, पीएच, फवारणीची वेळ व साधने तसेच यामध्ये मिसळली जाणारी इतर औषधे इ . मुळे अपेक्षित परिणामात बदल संभवतात.

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व