Search
Generic filters

Bore Charger (बोरचार्जर)

Bore Charger (बोर चार्जर)

सविस्तर माहिती

Bore Charger (बोरचार्जर)

 

भारतातील ८०% लोकसंख्या भूजलावर अवलंबून आहे. अति वेगात होणारा भूजलाचा उपसा आणि कमी प्रमाणात होणारे भूजलाचे पुनर्भरण ह्या मुळे अधिकाधिक बोरवेल कोरड्या होत चालल्या आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार अंदाजे एकूण भारतात ४.५ करोड बोरवेल आहेत. २०३० पर्यंत ह्यापैकी 54% बोरवेल ह्या कोरड्या होणार आहेत. एकूणच, पाण्याची गरज आणि त्याची उपलब्धता याचं प्रमाण बघता ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करेल. पाणी हा सगळ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

एकात्मिक जलसंधारण योजनेसारख्या अनेक योजनांचा फायदा पृष्ठभागावरील वरील भूजल धारकांना नक्कीच होतो पण बोरवेल च्या 200 ते 800 फुटांवरील भूजल धारकांमध्ये वरील स्तरावरचे पाणी पोहोचू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला जरी बोरवेलला चांगलं पाणी मिळाले तरी काहीच वर्षांमध्ये बोरवेलची पाणी देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते.

अति वेगात होणारा भूजलाचा उपसा आणि कमी प्रमाणात होणारा भूजलाचे पुनर्भरण ह्या मुळे अधिकाधिक बोरवेल कोरड्या होत चालल्या आहेत. ह्याच परिस्थितीवर मात करण्यासाठी बोचार्जर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात पडलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने पुनर्भरण करता येते.

बोरवेल रिचार्ज करणे ही एक महागडी आणि आव्हानात्मक गोष्ट आहे ह्यासाठी जागा आणि भूपृष्ठावरील पाण्याचा स्त्रोत गरजेचा असतो. पण प्रत्येक बोरवेल जवळ असे स्रोत असेलच याची शाश्वतता नसते.

बोरचार्जर नेमके काम काय करते?

बोरचार्जर या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे संपूर्ण बंद पडलेल्या किंवा कमी पाणी देणाऱ्या बोरवेलचे पुनर्भरण स्वस्तात व कमी वेळात होते.
तंत्रज्ञानामध्ये प्रथम बोरवेल मध्ये कॅमेरा च्या साहाय्याने प्रशिक्षित भूजल तज्ञ् भूजलाचे सर्वेक्षण व आलेखन करतात. यातून मिळालेल्या प्राथमिक निरीक्षणातून व सरकारी माहितीच्या आधारे जमिनीतील भूजल साठ्याचा अभ्यास केला जातो

बोरचार्जर या नावीन्यपुर्ण तंत्रज्ञानाने भूगर्भ शास्त्रज्ञ पेटंटेड रोबोटिक आर्म ने बोरवेल च्या केसिंग ला विशिष्ट ठिकाणी चिरा मारतात . यामुळे वरच्या भूजल स्तरांमधील पावसाचे पाणी खोलवरच्या भूजल धारकापर्यंत ( Aquifer ) पोहचते. या नवीन पुरवठ्यामुळे खोलवरच्या भूजलधारकांमधील भूजलाची गुणवत्ता आणि साठा यात खूप प्रमाणात सुधारणा होते आणि पाण्याचा पुरवठा दीर्घकाळ टिकतो.

बोरचार्जरचे फायदे आणि वैशिष्टये

1. बोरवेलंच्या पाणी पुरवठ्याच्या कालावधीत १-३ महिन्यांची वाढ
2. बोरवेलच्या पुनर्भरणात ४ ते २० पटीने वाढ
3. २ लाख ते ८० लाख लिटर पाण्याचे बोरवेल मध्ये पुनर्भरण
4. बोरवेलच्या पाण्याची पातळी आणि गुणवत्ता वाढते तसेच बोरवेल ज्यास्त काळ व अधिक पाणीपुरवठा करते.
5. कमी खर्चात आणि कमी वेळात अंमल बजावणी.
6. सिचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढतो.
7. ह्या तंत्रज्ञानें शेतीचे उत्पादन वाढते व आर्थिक फायदा होतो.
8. पाणी उपसण्यासाठी लागणार खर्च कमी होतो व तसेच टँकर साठी लागणारा खर्च देखील कमी होतो

संपर्क:- 8956960566 / 8956960570

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व