धनभूमी ॲग्रोटेक

धनभूमी ॲग्रोटेक

सविस्तर माहिती

धनभूमी ॲग्रोटेक 

धनभूमि निवेदन

आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील 80% टक्के व्यापार  हा शेतातील उत्पादन अंदाजे 48 % हे शेती व्यवसायाच्या उलाढालीवर अवलंबून आहे.पूर्वीपासून म्हणजे पिढीजात चालत आलेला उदर भरणाचा मार्ग म्हणजे ‘शेती’. घरची सदन शेती,वडील शेतकरी, घरातील वातावरण, शेती विषयी चर्चा या सर्वामुळे मनावर शेतीचे संस्कार होत गेले व शेतीची आवड निर्माण झाली. त्यात आमचे घर म्हणजेच वारकरी संप्रदाय त्यामुळे निसर्ग व निसर्गाने दिलेली देणगी/वारसा जपण्याची खूप आवड निर्माण झाली. निसर्गापासून बरेच शिकत गेलो व त्यामुळे त्याचा छंद लागत गेला त्यातून वेगवेगळे प्रयोग करत गेलो.

त्याच बरोबर सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार हा वारकरी संप्रदायाच्या सहाय्याने करण्याचे ठरवले.  सेंद्रिय शेतीसाठी लागणारी उत्पादने बनविणाऱ्या एनटिएल या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचलो व सेंद्रिय शेतीबद्दल पुरेपूर माहिती मिळवली. येथील सात वर्ष चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाचा अनुभव बरोबर घेऊन सेंद्रिय शेती साठी सज्ज झालो.

पूर्वीच्या पारंपारिक शेतीमध्ये अलीकडे बराच बदल झाला आहे. त्यामध्ये रासायनिक घटक वापरून बनवलेले कीटकनाशके तयार बाजारात उपलब्ध आहेत. शेतीच्या कामासाठी लागणारे आधुनिक उपकरणे देखील आहेत.या सर्वांचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी वापर केला जातो. पण या सर्वांचा म्हणजेच रासायनिक औषधांचा पिकावर वापर केल्यामुळे सजीव सृष्टीच्या आरोग्यावर व निसर्गवर जास्तीत जास्त दुष्परिणाम होत  चालले आहेत. निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. शारीरिक व्याधी वाढल्या आहेत.

जमिनीचा पोत बिघडून जमीन नापीक होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याला प्रश्न पडले आहेत की या रासायनिक खतांच्या अति वापरामुळे पिकांची भूक भागते का?  कीड रोग नियंत्रणाचे उपाय कोणते आहेत? असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्यांसमोर उभे आहेत. सध्या सरकारने पण नवीन धोरण अवलंबले आहे.  ते म्हणजे !!शेती वाचवा!! देश वाचवा !!हे धोरण व सोबत सेंद्रिय उत्पादने घेऊन शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी “धनभूमि” सज्ज झाली आहे.

श्री. संदीप हनुमंत होले

(डायरेक्टर ऑफ धनभूमि)

आमची उत्पादने 

  1. धन सॉईल
  2. धन ऍक्टिव्ह ग्रो
  3. धन ऍक्टिव्ह फ्लॉवर
  4. धन शॉट एन पी के
  5. धन किंग कोब्रा
  6. धन ऑरगॅनिक कार्बन सप्लिमेंट

संपर्क :- 7058010511, 8007347436

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व