गांडूळ खत व्हर्मिवॉश मिळेल

गांडूळ खत व व्हर्मिकंपोस्ट मिळेल

सविस्तर माहिती

गांडूळ खत व व्हर्मिवॉश मिळेल

उत्तम प्रतीचे गांढूळ खत आणि व्हर्मिवॉश मिळवण्याचे एकमेव ठिकाण.

 फायदे :-

  • गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.
  • जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते
  • फळाला वजन चकाकी येते
  • इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
  • पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.
  • झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
  • रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.

फळ बागेसाठी झाडाच्या वयोमानानुसार :- 

  • १ ते २ वर्ष 2 कीलों
  • 2 ते ४ वर्ष ३ कीलो
  • 4 ते 8 वर्ष  ४ कीलो

 गांडूळखत का वापरावे :- 

  1. गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.
  2. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.
  3. पाणी व रासायनिक खताच्या अति वापरामुळे महाराष्ट्रातील जमिनी चोपण होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत आहेत.
  4. महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे १९६० साली उसावर संशोधन केले असता गांडूळामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढतो हे सिद्ध झाले आहे.

गांडूळांचे व गांडूळ खताचे उपयोग :-

  1. माती च्या दृष्टिने गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
  2. गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
  3. गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
  4. जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  5. जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
  6. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
  7. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
  8. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व