डाळिंबाच्या पिकाला मिळेल तेल्यापासून मुक्ती बॅक्टो रेझ जीवाणुनाशक
विशेषतः डाळिंबावरील तेल्याच्या नियंत्रणासाठी
बॅक्टो रेझ : हे एक विविध गुणकारी वनस्पतींच्या अर्कापासून निर्मित केलेले अतिशय उच्च दर्जाचे जैव-जीवाणूनाशक आहे. जे मुख्यत्वे करुन वनस्पतींवर जीवाणूंद्वारे (उदा. झँथोमोनास, एर्विनिया, स्यूडोमोनास इत्यादी) होणाऱ्या रोगांवर अतिशय उपयुक्त असे जीवाणूनाशक आहे. विशेषतः डाळिंबावरील तेल्या रोगाचे तेलकट डाग नियंत्रित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच भाजीपाला, फळ आणि फुलपिकांच्या विविध प्रकारच्या जीवाणू रोगांवर परिणामकारकता सिद्ध केली आहे.
बॅक्टो रेझची कार्यपद्धती :
स्पर्शजन्य, आंतरप्रवाही कार्यपद्धती: बॅक्टो रेझ हे स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते. बॅक्टो रेझमध्ये असणाऱ्या काही विशिष्ट अशा घटकांमुळे हे औषध पिकांच्या वरील बाजूस ही सर्वत्र पसर आणि ते पेशींमध्ये व पेशींच्या अंतर जागेत पोहचून तिथे असणाऱ्या जिवाणूंचा नाश करते.
जिवाणूंवर होणारा परिणाम: बॅक्टो रेझ जिवाणूंच्या पेशींवर परिणाम करुन पेशीतील जीवद्रव्य संपवून त्यांना कोरडे करुन टाकते आणि त्या जिवाणूंच्या पेशींचे विघटन करुन त्यांच्यामधील जीवद्रव्य बाहेर काढून जिवाणूंचा समूळ नाश करते. त्याच बरोबर जिवाणूंचे पेशी विभाजन, जिवाणूंच्या पेशीमध्ये तयार होणाऱ्या प्रथिनांची निर्मितीही थांबवते.
फायटोटॉनिक परिणाम: बॅक्टो रेझ हे विविध वनस्पती अर्कांपासून बनलेले असून ते पिकांवर फायटोटॉनिक परिणाम दाखवते. नवीन रोगमुक्त फुलकळी व फळधारणा यामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा होते व उत्पन्न वाढते.
विद्राव्य खतांसोबत गुणकारी संयोग: बॅक्टो रेझ हे विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या श्रेणी सोबत फवारणीसाठी उपयोग केल्यास त्यांची अत्यंत प्रभावशाली क्रियाशिलता वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
फवारणीचा कालावधी: रोग नियंत्रणासाठी बॅक्टो रेझची ६ ते ७ दिवसांच्या अंतरावर फवारणी करावी.
फवारणीचे प्रमाण: १.५ ते २.५ मिली प्रति लिटर पाण्यासाठी, पिकांच्या वाढीचा टप्पा कीड आणि रोगांच्या प्रादुर्भाव प्रमाणानुसार फवारणी करावी.
शिफारस केलेली पिके: सर्व भाज्या, सर्व फळे (विशेषतः डाळींबावरील तेल्या) आणि फुले यांसारख्या सर्व पिकांवर उपयुक्त आहे.
टीप : औषधांच्या उत्कृष्ट परिणामासाठी HTP किंवा पॉवर पंपाने फवारणी करावी.
संपर्क :- 7385758995 , 8591401503 , 8591401506