उत्तम प्रतीचे गांडूळखत मिळेल
गांढूळ खत घरपोच मिळेल
गांडूळखत का वापरावे :-
- गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.
- त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.
- पाणी व रासायनिक खताच्या अति वापरामुळे महाराष्ट्रातील जमिनी चोपण होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत आहेत.
- महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे १९६० साली उसावर संशोधन केले असता गांडूळामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढतो हे सिद्ध झाले आहे.
गांडूळांचे व गांडूळ खताचे उपयोग :-
- माती च्या दृष्टिने गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
- गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
- गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
शेतकयांच्या दृष्टीने फायदे :-
- इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.
- झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते. रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.