11-02-2023
महाराष्ट्रात अव्होकाडो फळ लागवडीस चालना
महाराष्ट्रात ऍव्होकाडो (लोणी फळ) फळाच्या लागवडीला चालना देण्यात येत असून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग केला आहे. जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे संशोधन आहे त्याचाच भाग म्हणून या लागवडीकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात या फळाची प्रायोगिक लागवड यशस्वी होत आहे व भविष्यात अव्होकाडोची लागवड मोठी क्रांती ठरेल, असा विश्वास आहे.
ऍव्होकाडो हे मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो.
फळांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर चरबीचे प्रमाण सर्वाधिक असलेले हे एकमेव फळ आहे. या फळातील चरबी मानवी शरीराला कोणतीही हानी पोहोचवू शकत नाही.
या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे फळ असून सध्या महाराष्ट्रात या फळाची उलाढाल 50 कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे काही उत्कृष्ट संशोधन आहे त्याचा वापर केला पाहिजे. महाराष्ट्रातील हवामान या फळाला पोषक असून त्याची लागवड यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती ठरेल.
बटर फ्रूट किंवा ऍव्होकाडो हे आता हळूहळू लोकप्रिय फळ पीक म्हणून उदयास येत आहे. ताजे फळ म्हणून व तसेच प्रक्रियेसाठी योग्य असल्याने या फळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोग्यासाठी फायदेशीर आणि वाढत्या मागणीमुळे हे फळ आता बाजारात चांगल्या किंमतीत विकले जात आहे. अलीकडे 2015 नंतर या फळाला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
येणाऱ्या काळात ऍव्होकाडो फळ हे महत्वाच्या काही फळ पिकांपैकी एक असेल.
ऍव्होकाडो सामान्यत: सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. योग्य पाऊस, थंडी व सूर्यप्रकाश असेल अशा तिन्ही स्थितींमध्ये त्याची वाढ होते, तरी अशा प्रदेशासाठी योग्य असलेल्या जातींनुसार उत्पादन आणि अनुकूलता या तिन्ही स्थितीत वाढतात.
उष्ण हवामानासाठी त्यानुसार जाती विकसित केल्या जात आहेत. त्यातील पिंकरटन ही जात महाराष्ट्रासाठी सर्वात खात्रीशीर असल्याचे प्रयोगाअंती समोर येत आहे.
पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून 40 - 50 किलो फळे प्रति वर्षी मिळू शकतात.
उत्कृष्ट व दुर्मिळ आंबा रोपे दर
अधिक मार्गदर्शन व रोपांसाठी संपर्क
मिलींद कुलकर्णी : 8999905139
--
मिलींद कुलकर्णी
8999905139
8999905139
चांभारवाडी, ता. कन्नड, जि. संभाजीनगर