जिरेनियमची शेती औषधी वनस्पती
नमस्कार,
शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत.ती म्हणजे जिरेनियम.ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 8000-10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते.लागवड केल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत उत्पादनास सुरुवात होते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी (नाहीच)व खते यामध्ये खर्च कमी आहे.
जिरेनियम या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत जागेवर 12500 हजार रु मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळत.या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.हायडेनसिटी परफ्यूम तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.या वनस्पतीची भारताची मागणी दर वर्षाला 200 ते 300 टनाची आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला दहा टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या आणि अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करने अधिक फायदेशीर ठरेल. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक कमी पाणि आणि जास्त फायदयाचे आहे, यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही आणि हे पिक इनस्टंट अर्निंग आणि शाश्वत उत्पन्न देणारे पिक आहे,
अधिक माहिती साठी किंवा प्रत्यक्ष प्लॉट भेटि साठी संपर्क करु शकता .प्लांटिंग मटेरियल उपलब्ध आहे .
7588174115
गणेश सांगळे