बोडके ऑरगॅनिक्स

बोडके ऑरगॅनिक्स
Nikhil bodake  
गांडूळ खत 15 रुपये प्रति किलो, वर्मीवॉश 50 रुपये प्रति लिटर, सेंद्रिय स्लरी 100 रुपये प्रति लिटर
 
 
 
 मेसेज करा
 7741030394

बोडके ऑरगॅनिक्स 

शेतीसाठी सेंद्रियखत | समृद्ध गांडूळखत 

 ( पीक प्रतिबंधक अवस्थेसाठी जोडलेले सूक्ष्मजीव जीवाणू | सूक्ष्मजीव ) वर्मीवॉश व जैविक टॉनिक आणि कीट नियंत्रण (सेंद्रिय स्लरी )
 

  •  गांडुळखत -

1.गांडुळांच्या शरीरातून निघणारी विष्ठा व द्रव पदार्थ म्हणजेच गांडुळ खत.
2.एक नैसर्गिक प्रक्रिया ज्याद्वारे गांडुळ आणि सूक्ष्मजीव सक्रिय सेंद्रिय कचऱ्याचे स्थिरीकरण करण्यास मदत करतात आणि त्यास उपयुक्त माती पूरक आणि पिक पोषणाच्या स्त्रोतामद्ये रूपांतरित करतात.
3.पिकासाठी व मातीसाठी हे एक जैविक व भौतिक गुणधर्म पूर्ण करण्यास नैसर्गिक प्रकारे मदत करते.

गांडूळ खताचे फायदे- 
1. पिकाच्या लागवडी वेळी वापरल्याने रोपांची सर्वांगिण वाढीस मदत करते.
2. रोपांची मर थांबवते. 
3. पांढर्‍या मुळा ची वाढ चांगली होते. 
4. मूळ कुज व मूळ सड होत नाही.
5. Humic acid व Fulvic Acid  मिळते 
6. जमिनीचा सामू पिका योग्य करण्यास मदत होते. 
7. गांडूळ खतामुळे जमिनीचा ताण कमी होतो व पिकाची उगवण क्षमता, सचिद्रता व उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते आणि जमिनीचा पोत सुधारतो.
8. गांडूळखता च्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म पिका योग्य होते.
9. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते 
10. जमिनीमध्ये oxygen , Nitrogen व carbon चे प्रमाण वाढवते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ४ पटीने वाढते 
11. पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
12. गांडूळ खतामुळे जमीन सुपीक राहते व नैसर्गिक प्रकारे जमिनीची मशागत होते.
13. गांडुळ खत हे पीकांचे पुर्ण अन्न आहे मुख्य , दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये गांडुळ खतामध्ये उपलब्ध स्वरूपात असतात, जे पिकाच्या सर्व गुण वाढीसाठी आवश्यक असतात.
14. गांडूळखतामध्ये तिन्ही प्रकारची संजीवके असल्याने वाढ चांगली व लवकर होते.
15. ओला कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होते. 
16. गांडूळ खतामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ( मातीजन्य रोग )

  • वर्मीवॉश
    वर्मीवाश एक जैविक तरल पदार्थ आहे, जो गांडुळाच्या शरीर व गांडूळखत पासून बनतो. वर्मीवाश मध्ये नाईट्रोजन, पोटेशियम, फॉस्फोरस, सल्फर , केल्शियम, मैग्निशियम, आयरन, झिंक, बोरान (यूरिक एसीड, फुल्विक एसीड आणि ह्युमिक एसीड) यांसारखे पोषक तत्व आहेत.

जैविक टॉनिक व किट नियंत्रण

1. मातीच्या आरोग्यात सुधारणा करते - जेणेकरून मातीचा PH, रचना, पोत, पाणी टिकून ठेवण्याची क्षमता सुधारते. मातीची उर्वरित शक्ति व जिवाणूंची संख्या वाढवण्यास मदत करते.

2. पिकांच्या सार्वजनिक / सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त - यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये तसेच सूक्ष्मजीव यांचा सारांश असल्याने पिकाच्या पोषणास मदत करते.

3. पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते - मातीजन्य रोग - करपा, मूळ कुज, मूळ सड, नेमाटोड, मेली बग,थ्रीप्स, रसशोषक किडे रोगांवर परिणाम कारक आहे व पोषक तत्वांची कमतरता वर योग्य व प्रभावशाली प्राकृतिक जैविक किट नियंत्रण करते.

4. पिकाची उगवण क्षमता, उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढीस मदत करते. पिकाची पोषण तत्त्व ची कमी दूर करते. रोपाच्या अवस्थेत हुमिक व नायट्रोजन पुरवते, फुलांची आणि फळं धारण वेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देते ( नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम,एक्टिनोमाइसिटस, आयरन, झिंक, बोरॉन तसेच फुलविक ऍसिड आणि युरिक ऍसिड , ह्युमिक ऍसिड).

 कीड आणि रोग नियंत्रण - नेमाटोड, मेलीबग ,हुमणी , थ्रीप्स, रसशोषक किडे,करपा ,मूळकुज व मूळसड व मातीतून होणार्‍या रोगावर उपाय.

  • Solubility/विद्राव्यता

▪︎ गांडूळखत व सेंद्रीय स्लरी पोषक टक्केवारी आणि टिकाऊपणा -

1. नायट्रोजन (N): 1-3% (1-3 महिने)
2. फॉस्फरस (पी): 1-3% (3-6 महिने)
3. पोटॅशियम (के): 2-5% (3-6 महिने)
4. कॅल्शियम (Ca): 2-5% (6-12 महिने)
5. मॅग्नेशियम (Mg): 1-3% (3-6 महिने)
6. सल्फर (एस): 1-2% (1-3 महिने)
7. सूक्ष्म अन्नद्रव्ये (B, Cu, Fe, Mn, Mo, Zn):0.1-1%
8. सेंद्रिय कार्बन (C): 30-50% (1-2 वर्षे)
9. ह्युमिक ऍसिडस्: 10-30% (1-2 वर्षे)
10. फुलविक ऍसिडस्: 5-15% (3-6 महिने)


गांडूळ खत, वर्मीवॉश व सेंद्रीय स्लरी साठवण | Vermicompost , vermiwash and organic slurry storage

1. थंड आणि कोरडी जागा | Cool and dry  place

2. हवाबंद कंटेनर | Airtight containers

3. कीटकांपासून संरक्षण | Protection from pests

4. आर्द्रता राखा | Maintain humidity

5. प्रदूषण टाळा | Avoid contamination

6. शेल्फ लाइफ गांडूळ खत 6 महिने ते 1 वर्षापर्यंत साठवले जाऊ शकते, स्टोरेज परिस्थितीवर अवलंबून.
 

  • वापर 
     1. पिकाच्या मुळाजवळ गांडूळ खत घाला. 
     2. प्रत्येक रोपातील बेडसाठी 400gms ते 500gms आणि मोठ्या झाडांसाठी 1kg ते 2kg. 
     3. 60 दिवसांनी पुन्हा वापर करा. 
     4. 15 ते 20 दिवस रासायनिक  वापर टाळा.
     5. रासायनिक खतां सोबत  वापर करू नका 
     6. चांगल्या परिणामांसाठी सेंद्रिय उत्पादने मेडिया  वापरला पाहिजे
  •  वर्मीवॉश 
    1.फवारणीसाठी: 5 -10 मिली वर्मीवॉश प्रति लिटर पाणी 
     2.ड्रीप मधून देण्यासाठी : ५० मिली वर्मीवॉश प्रति लिटर पाणी 
    3.बीजप्रक्रियेसाठी : 5-10 मिली वर्मीवॉश प्रति लिटर पाणी
  • सेंद्रिय स्लरी -  
    1.फवारणीसाठी: 10-20 मिली सेंद्रिय स्लरी प्रति लिटर पाणी
    2.ड्रीप मधून देण्यासाठी : 50 मिली सेंद्रिय स्लरी प्रति लिटर पाणी  3.बीजप्रक्रियेसाठी: 10-20 मिली सेंद्रिय स्लरी प्रति लिटर पाणी  
    4.सिंचन मधून : 20 लिटर सेंद्रिय स्लरी प्रति 100 लिटर पाणी


पीक - पेरू, द्राक्ष, डाळिंब, आंबा, सीताफळ, केळी, बोरी,पपई, कलिंगड, खरबूज, लिंबू, चिक्कू, संत्रा मोसंबी, नारळ, Home Garden, Nursery ,Terrace Garden, Kitchen Garden, सर्व पिकासाठी उपयुक्त आहे 
 

( माती व पीका वर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही )

  •  गांडूळ खत 15 रुपये प्रति किलो - 1 किलो , 5 किलो, 50 किलो पॅकिंग
  •  वर्मीवॉश 50 रुपये प्रति लिटर - 1 लिटर, 5 लिटर, 10 लिटर, 20 लिटर पॅकिंग
  •  सेंद्रिय स्लरी 100 रुपये प्रति लिटर - 1 लिटर, 5 लिटर, 10 लिटर, 20 लिटर पॅकिंग

जैविक पिकवा🌾, जैविक खा 🍉🍎, स्वस्थ रहा 🌍🏋‍♂️

तुमची ऑर्डर आत्ताच बुक करा !
☎️+917741030394

पत्ता - 92/2 गलंदवाडी , अनगर स्टेशन रोड, तालुका - मोहोळ, जिल्हा - सोलापूर, महाराष्ट्र 413214

Angar

organics, सेंद्रियखत, गांडूळखत

 मेसेज करा
 7741030394
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading