स्वामी समर्थ गुळ
मी.संदिप रमेश नरूटे
मु.पो.लासुरणे ता.इंदापूर जि.पुणे
आपणास कळवितो की , मी आदरणीय सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या 14 वर्षाच्या अथक परिश्रमातून साकार झालेली सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत असून मी गेल्या दहा वर्षापासून विषमुक्त रसायनमुक्त नैसर्गिक शेती करत आहे.
या शेतीत मी उसाचे पीक घेतलेले असून या उसाला मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत व कीटकनाशक यांचा वापर केलेला नाही. तसेच या शेतीला फक्त गावरान गाईच्या शेन व गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीला वापरले आहे.
स्वामी मी आत्ता या शेतीतल्या उसापासून विषमुक्त व रसायन मुक्त गुळ व काकवी तयार केलेली आहे. या गुळ व काकवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम ,फॉस्फरस, प्रोटिन्स, विटामिन्स, मॅग्नेशियम ,न्यूटन्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे ही गुळ व काकवी शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.
या गुळापासून बनविलेला चहा अत्यंत लाभदायक आहे. तसेच जेवणानंतर रोज एक गुळाचा बारीक खडा खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारते व सांधेदुखी, मणक्यातील गॅप, कंबरदुखी यांसारख्या हाडांच्या आजारावर ती अत्यंत गुणकारी आहे.
मी आपणास सावध करतो की रोडच्या कडेच्या व इतरत्र मिळणार्या गुळ व काकवी ही रासायनिक उसापासून बनविलेले असते व त्यावर फक्त सेंद्रिय गुळ व काकवी असे लेबल लावलेलें असते तरी त्यापासून सावध राहावे ही विनंती.
आमच्याकडे गुळाची एक किलो ची किंमत फक्त 80 रुपये व एक किलो काकवीची किंमत 100 रुपये प्रमाणे आहे.
संपर्क: संदिप नरुटे
9511833438
9970918083
पत्ता:
मु.पो.लासुरणे ता.इंदापूर जि.पुणे, महाराष्ट्र, भारत.