माती व पाणी परिक्षण करून मिळेल (औरंगाबाद)
आमच्याकडे योग्य दरात माती व पाणी परीक्षण करून मिळेल.
माती परीक्षणमुळे होणारा फायदा जाणुन घेऊ
- माती परीक्षण केल्यामुळे जमिनीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे हे समजते.
- आवश्यक ते पोषक घटक वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन करता येते, परिणामी उत्पादन वाढते.
- खतांचा अपव्यय वापर टाळता येतो परिणामी लागवड खर्च कमी करता येतो.
- जमिनीत कोणते पीक योग्य ठरेलं हे समजते, त्यामुळे जमिनीच्या पोतनुसार पीकपद्धती ठरवता येते.
- एकंदरीत माती परीक्षणमुळे सुधारित पीक पद्धती ठरवता येते आणि यामुळे खर्चात बचत होते आणि उत्पादनवाढीसाठी मदत होते
माती परीक्षण म्हणजे काय याची सविस्तर माहिती :
जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच). विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार वरील अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण या बाबत माहिती मिळते व त्यानुसार पिकांच्या आवश्यकते नुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो. माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच पण अन्नद्रव्यांवर होणार्या खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठी मदत होते म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब होय.
पिकांना विविधप्रकारच्या १७ अन्नद्रव्यांची कमी प्रमाणात गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये, हवा, पाणी व जमिनीतून शोषूण घेतात. जमिनीत सतत पिके घेतली जात असल्यामुळे तसेच अधिक उत्पादन देणार्या जातींची लागवड व सधन शेती पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिके जास्त प्रमाणात शोषून घेतात. म्हणून त्याचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खताद्वारे करण्यात येतो. पिकाला ज्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज आहे त्यानुसार पुरवठा करणे ही अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी माती परीक्षण करून जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार, तसेच सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पिकांना या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय व रासायनिक खताद्वारे केल्यास उत्पादनात वाढ होतेच व आर्थिक फायदा सुद्धा होतो. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा दिल्यास सर्वसाधारणपणे १५ ते ४० टक्के फायदा शेतकर्यांना मिळण्यास मदत होते.
तपासणी दर हे घटक निहाय आहे ४५०/- ५००/-व २५०/-
अधीक माहितीसाठी संपर्क : 9923409276