सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. निर्मीत कामगंध (फेरोमोन ट्रॅप)
कीटक स्वत:च्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण स्वजातीयांशी सुसंवाद साधण्यासाठी सोडतात, यांना फेरोमोन असे म्हणतात. विरुद्धलिंगी कीटक आकर्षीत करण्यासाठी या फेरोमोन्सचा प्रामुख्याने उपयोग होतो. त्यामुळे यांना कामगंध असेही म्हणतात. वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिमरित्या हे कामगंध तयार करून त्यांचा उपयोग किड व्यवस्थापनासाठी केला जातो.
शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. त्या गंधामुळे किटक सापळ्याकडे आकर्षित होवून सापळ्यात अडकतात व मिलन न झाल्याने प्रजोत्पादन होत नाही.
कामगंध सापळे वापराचे फायदे:
- सापळे वापरून किडींचे सर्वेक्षणकरता येते. त्याद्वारे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून कीटकनाशकांच्या फवारणीचे नियोजन करता येते.
- मोठ्या प्रमाणात किडींचे पतंग सापळ्यात पकडून किटकांच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन त्यांच्या पुनरुत्पत्तीला अटकाव होतो. परिणामी रसायनांचा वापर कमी होतो.
- रसायनांचा वापर घटल्यामुळे परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहून नैसर्गिक नियंत्रणाचे चक्र क्रियाशील होते.
- कामगंध सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. त्याचबरोबर कामगंध सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी असतो.
- कामगंध सापळ्यातील रसायनांमुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होत नाही.
सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज मार्फ़त निर्मित विविध दर्जेदार कामगंध सापळे योग्य दरात उपल्बध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8010900895