फुले संगम KDS 726 सोयाबीन बियाणे मिळेल 

फुले संगम KDS 726 सोयाबीन बियाणे मिळेल 

सविस्तर माहिती

फुले संगम KDS 726 सोयाबीन बियाणे मिळेल

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांचे कसबे डिग्रज, सांगली येथे संशोधित केलेली सोयाबीन जात  “फुले संगम – KDS 726”  चे तांबेरा रोगमुक्त बियाणे मिळेल.

उत्पन्न: एकरी 18- 20 क्विंटल

बियाणासाठी संपर्क: श्री. संतोष दत्तात्रय गुळवे पाटील.

गोगलगाव निमगाव जाळी रोड, ता. राहाता , जि. अहमदनगर , महाराष्ट्र 413736

9404038584 , 9763368584

सोयाबीन सुधारित वाण:- KDS- 726 (फुले संगम)

 १) पेरणी लागवडीचे अंतर:- पेरणी रब्बी हंगामात नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरवड्यात जमीन योग्य मशागत करून , भारी जमिनीत पेरणी ४५ सें.मी. × ५ सें.मी. आणि मध्यम जमिनीत ३० से.मी. × १० सें.मी. अंतरावर करावी.

 २) बियाणे :- सलग पेरणीसाठी ३० किलो प्रति एकर तर टोकण पद्धतीने लागवड केल्यास एकरी २० ते २२ किलो बियाणे वापरावे.

 ३) बीज प्रक्रिया:- बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकिलो बियाण्यास  थायरम पावडर च्या सहाय्याने बीजप्रक्रिया करावी.

 ४) खत मात्रा:- 

  • भरखते :- चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टर 25 ते 30 गाड्या वापरावे.
  • वरखते:- सोयाबीन पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत. अथवा दोन चाड्याच्या पाभरिने खते व बियाणे एकाच वेळी पेरून घ्यावे.

 ५) आंतरमशागत:- तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी पेंडीमेथँलिन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पिक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करून शेत तण मुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टरी इमॅजिथॅपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.

६) पाणी व्यवस्थापन:- पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

 ७) काढणी:- सोयाबीनच्या शेंगा चा पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार १०० ते ११० दिवसात काढणी करावी. पीक काढण्यास उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व