सर्व पिकांना उपयुक्त बोरामिल(सुक्ष्म अन्नघटक युक्त खत) Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
सर्व पिकांना उपयुक्त बोरामिल(सुक्ष्म अन्नघटक युक्त खत)

03-09-2022

...

सर्व पिकांना उपयुक्त बोरामिल(सुक्ष्म अन्नघटक युक्त खत)

 

बोरामिल म्हणजे पिकाला आवश्यक असणाऱ्या पंधरा मुलद्रव्यातील पाच सूक्ष्म मुलद्रव्यांच्या मिश्रणाचे जमिनीचे सामु.(P.H.) नुसार तयार केलेले खत होय.


         जमिनीतून पिकाचे चांगल्या प्रतिचे व भरपूर उत्पादन घेण्यासाठी पंधरा मुलद्रव्यांची आवश्यकता असते त्यापैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मुलद्रव्ये नैसर्गिक हवा व पाण्यातून मिळतात व मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश(N.P.K.) ही रासायनिक खतातून म्हणजे युरिया, सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश यासारख्या सरळ खतातून व इफ्को, सुफला, संपूर्णा यासारख्या खतातून आपण त्यांना देतो, पण उर्वरित आठ सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये आपण त्यांना कधीच दिलेली नाहीत. त्यापैकी पाच म्हणजे लोह (फेरस) झिक, मँगेनिज, कॉपर, बोरॉन इत्यादी सूक्ष्म द्रव्ये आपणास बोरॅमिल या खतातून देता येतात. बोरॅमिलमध्ये घटकांचे प्रमाण शासनाच्या ग्रेडनुसार फेरस २%, झिंक ५%, मँगेनिज १%, कॉपर ०.५%, बोरॉन १% असे आहेत.

बोरामिलचे फायदे :

  • बोरामिल मधील वेटींग व डिस्पर्सिंग एजंट त्यातील सूक्ष्म पोषक द्रव्ये पाण्यात चांगली विरघळून रोपांना संपूर्णत:शोषून घेता येतील असे करतात , त्यामुळे कमीत कमी अन्न वाया जाते.
  • बोरामिल खतामधील महत्वाचे पोषक अन्न जास्तीत जास्त वापरले जाण्यासाठी सहाय्य करते.
  • बोरामिल रोपांच्या शरीराची स्थिती चांगली राखून त्यांची नीट वाढ होण्यास सहाय्य करते. 
  • बोरामिल रोपांची पाने दाट हिरवी राखते, पिकाच्या निरोगी वाढीचे हे लक्षण आहे.
  • बोरामिल फुटवा वाढवण्यास, दाण्यांची संख्या वाढवण्यास, फळधारणा क्षमता वाढवण्यास सहाय्य करते.
  • बोरामिल मुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनात वाढ मिळते.
  • बोरामिल सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढते.
  • बोरामिल पोषक द्रव्यांचे स्थिरीकरण आणि मातीत मिसळून रोपाला उपलब्ध न होणे ही प्रतिक्रिया टाळते
  • बोरामिल महत्वाचे पोषक अन्न जास्तीत जास्त वापरले जाण्यासाठी सहाय्य करते व पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.

संपर्क:- 9011079288