तेजोमय मधकेंद्र व गांडूळखत प्रकल्प Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
तेजोमय मधकेंद्र व गांडूळखत प्रकल्प

15-12-2021

...

मधमाशी पेट्या भाड्याने देणे आहे

पिके : डाळींब, लिंबू, संत्रे, मोसंबी, सूर्यफूल, तीळ, मोहरी, ओवा
शेवगा, जांभूळ

नैसर्गिक परागीभवन, उत्पन्नवाढीसाठी मधमाशी पेट्या उपलब्ध आहेत.

मधमाश्यांमार्फत नैसर्गिकरित्या होणाऱ्या परगी भवनातून बिजधारणा / फलधारणा होते. 

त्या पासून भरघोस व दर्जेदार उत्पन्न घेता येते.

परागी भवनाच्या क्रियेत पूंकेशर ( नर फुलातील परागकन ) हे मादी फुलातील स्त्रीकेशरांपर्यंत ( मादी फुलातील परागकण ) वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते.

(हे वहन इतर कीडी व हवेच्या माध्यमातुन ही होते परंतू मधमाशी मुळे याचा वेग १० पटीने वाढतो पूंकेशर व स्त्रीकेशर यांचे मीलन होऊन मादी फुलात बीज धारणेची प्रक्रीया सुरू होते. यालाच आपण गाठ सेट होणे असेही म्हणतो. मधमाशी द्वारा घेतलेल्या पिकांचा भार 40% पर्यंत वाढू शकतो.

ज्या फुलात परागीकरण क्रिया घडत नाही. त्यांची बीजधारणा होत नाही. म्हणजेच त्यांची गळ होते.

बऱ्याच वेळा ज्या बागेत मधमाशीचे प्रमाण कमी असते त्या बागेत कळींची गळ मोठ्या प्रमाणात होते बऱ्याच वेळा मधाशी व्यवस्थापन व आकर्षित करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या आमिषाची पुरेशी माहीती नसल्यामुळे मधमाशीचा पुरेपूर उपयोग घेता येत नाही.

मधमाशीचा पूरेपूर उपयोग घेण्यासाठी संपर्क करा. 

पेटी मधला मध काढून दिला जाणार नाही. 

फक्त परगीभवणासाठी पेट्या मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क : तेजोमय बळप  9403454503 / 8459934561