खपली गहू बियाणे विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
खपली गहू बियाणे विकणे आहे

03-11-2022

...

खपली गहू बियाणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचा खपली गहू बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे

खपली गहू हा जुन्या गावरान गव्हाची 5000 वर्षे जुनी एक जात आहे. याचे महत्व आयु्र्वेदात सांगितले आहे.

ही भारताला मिळालेली दैवी देणगी आहे. ही जात चवीला रुचकर आहे. खपली गव्हाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. ही जात डायबिटीस, हार्ट अटॅक, हाडांचा कमकुवतपणा, दातांचा कमकुवतपणा यांची झीज भरून काढण्यास अत्यंत उपयोगी आहे.
  2. यात ग्लूटेनची मात्रा कमी असल्यामुळे मधुमेही पेशंटला खाण्यास अत्यंत योग्य असा गहू आहे. याच्या रोज सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
  3. या गव्हाची पोळी लालसर, मऊ व खाण्यास रुचकर अशी आहे. आणि जुन्या शरबती वाणापेक्षा यामध्ये गोडवा अधिक आहे.
  4. हा गहू अत्यंत कडक व कणखर आहे. हा गहु संकरित गव्हा पेक्षा बारिक व लांब आहे. व पचावयास हलका व पौष्टीक आहे.
  5. यापासून शेवया खीर, शिरा, कुरडया, पुरण पोळ्या गव्हाचे सर्व प्रकार अत्यंत रुचकर स्वादिष्ट व पोष्टिक व शरीराला बळ देणारे आहे
  6. या मध्ये प्रथिनांची मात्रा ही 10 ते 15 टक्के, कर्बोदकांची मात्रा 75 ते 82 /83 टक्के, तंतुमय पदार्थ 15 ते 16 टक्के आहे.
  7. खपली गहू खाण्यामुळे स्वादुपिंड वर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो .व मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. व हा वात पित्तशामक आहे. हा गहू खाण्यामुळे बरेच आजार दुरुस्त होतात

आयुर्वेदिक डॉक्टर हे लोकांना हा गहू खाण्यास सांगतात. जुने लोक हा गहू खात असल्यामुळेच बलवान व कणखर असे होते.

परंतु गव्हाचे उत्पन्न हे मर्यादित असल्यामुळे त्याचे भाव थोडे आपल्याला जास्त वाटतात. पण त्यातली पौष्टिक पणा व इतर इतर गोष्टींचा विचार केला तर ते योग्य आहेत.

लागवडीस यंत्राद्वारे पेरणी साठी एकरी 40 किलो बियाणे लागते.

अधिक माहितीसाठी संपर्क : चेतन गाडे 9890549211

wheat seed for sell in satara, wheat seed price