मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र

06-04-2022

...

मानवचलीत कांदा,कोथिंबीर,मेथी पेरणी यंत्र

 

शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत.  यापैकी एक गरज म्हणजे  म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत.

तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय 

मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते

याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 

 1. कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
 2. कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
 3. पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
 4. दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो  ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत
 5. हे यंत्र 5 व 7 फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर 42 इंच म्हणजे साडेतीन फूट आहे.
 6. दोन ओळीतील अंतर पाहिजे तेवढे ठेवता येते
 7. हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
 8. वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
 9. आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी  अतिशय उपयुक्त
 10. पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक  बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
 11. या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.

पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते

आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा 

रणजित नाईक निंबाळकर

संपर्क:- 9270099000

हरिहर अॅग्रो