समृद्धी भूसूधारक Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
समृद्धी भूसूधारक

27-07-2022

...

समृद्धी भूसूधारक (धेनु एग्रो)

 

आमच्याकडे उत्तम प्रतीचे देशी गायीच्या शेणापासून तयार केलेले ” समृद्धी भूसूधारक ” – Soil Conditioner…..

विश्वातील समस्त प्राणी मात्रांचा आधार अन्न आहे. पूर्वी आपल्या देशातील भाजीपाला व अन्नधान्य स्वादिष्ट आणि पोषक होता. परंतु, रासायनिकीकरणाच्या अतिरेकामुळे स्वास्थ्य समस्या वाढीस लागल्या आहेत.

आपण तर पूर्वीपार जैविक मार्गावर होतो. पुढे त्यातच सुधार करून चालण्याऐवजी आपण रासायनिक शेतीचा आधार घेतला. सुरुवातीला नफ्याची वाटणारी रासायनिक शेती मात्र आज शेतकर्‍यांचा जीव घेऊ लागली आहे.

शेती खरोखरच संपूर्ण संस्कृतीची जननी आहे. या दिवसात वाढत असणार्‍या आजारपणावर चिंतनात्मक दृष्टीने पाहिल्यास आपणास लक्षात येईल की आपण शुद्ध आहार घेतला तर आपल्या अधिकांश आरोग्याच्या समस्या आपोआप कमी होतील.

या सार्‍या सेंद्रिय उत्पादित पोषण मुल्य देणार्‍या उत्पादनासाठी ” धेनु एग्रो “ तुमच्यासाठी घेऊन आलाय संपूर्ण देशी गायींच्या शेणापासून निर्मित जैविक “भूसूधारक” ज्याने जमिनीची पोषण मूल्ये वाढून उत्पादनात प्रचंड वाढ होते.

ह्यापासून शेतीसाठी आणि पिकासाठी नैसर्गिक स्वरुपात नत्र, स्फूरद आणि पालाश ह्या पोषक द्रव्यांसोबतच उपयुक्त जिवाणू, वर्धके, संजिवके आणि संप्रेरके मिळतील.

समृद्धी भूसूधारकाचे फायदे :-

  • जमिनीचा सामु संतुलित राहतो.
  • जमिनीची सुपिकता वाढते.
  • पिकाची रोग प्रतिकार शक्ति वाढते.
  • जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
  • उगवणी नंतर पीक जोमदार वाढते.
  • पिकातील बुरशी, खोडकिडा, मुळकूज, मर असे बुरशीजन्य रोग कमी होतात.
  • पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते.
  • जमिनीत पाण्याचा निचरा होतो.

तर सर्व शेतकर्‍यांनी आजच ऑर्डर करा आणि आपल्या जमिनीला विषमुक्त होण्यापासून वाचवा.

संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9309137401

Advantages of Soil Conditioner, Dhenu Agro