Search
Generic filters

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता बॅंक खात्यावर आणि नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता बॅंक खात्यावर आणि नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता बॅंक खात्यावर आणि नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. 2 हजार रुपयांप्रमाणे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुणाला हप्ता जमा झाला याचा कानोसा घेण्यातच दंग आहेत. या दरम्यान, चर्चेचा विषय ठरत आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एसएमएस’ चा. हा 2 हजाराचा हप्ता जमा झाल्यानंतर एसएमएस हा येतोच पण या हप्त्याच्या दरम्यान वेगळाच संदेश मिळालेला आहे. नववर्षाच्या शुभेच्छां बरोबरच या योजनेच्या निधीचा उपयोग शेतीची उपकरणे घेण्यासाठी होईल तसेच एक लिंक देण्यात आली असून यावर क्लिक करुन नैसर्गिक शेती कशी केली जाते हे बघण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरु आहे.

काय आहे SMS मध्ये ?

पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेल्या SMS मध्ये शेतकऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन या निधीचा वापर हा शेती उपकरणांसाठी करण्याचे आवाहन केले आहे. तर नैसर्गिक शेती पध्दत पाहण्यासाठी दिलेली लिंक पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.याच रणनीतीचा एक भाग म्हणून सरकारने एकाच वेळी नैसर्गिक शेती पध्दत ही 10 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने हा एसएमस पाठवलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती वाढवण्याचे आवाहन केले आहे. असा एसएमएस शेतकऱ्यांना पाठवलेला आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

तर समजा खात्यावर पैसे जमा होणार

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पैसे खात्यावर वर्ग करुन तीन दिवस झाले आहेत. या योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये आले नसतील आणि एसएमएस मध्ये केवळ FTO असेच दाखवत असेल तर समजा की रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे. आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर असा एसएमएस असेल, तर पैसे हस्तांतरित झाल्याचे समजून घ्या. उर्वरीत लाभार्थ्यांना एक-दोन दिवसामध्ये हा निधी खात्यावर जमा होणार आहे. फंड ट्रान्सफर ऑर्डर असा संदेश असेल तर एकतर हप्ता रक्कम ही प्रक्रियेत आहे किंवा खात्यावर जमा झाली. जर तुमची आधार कार्ड पडताळणी झाली नसेल, तर मात्र, पैसे जमा होण्यास उशिर होणार आहे.

असे पहा पैसे जमा झाले का नाही?

– पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/.
– आपल्या उजव्या कॉर्नरमध्ये Beneficiary Statu’च्या पर्यायावर क्लिक करा.
– मग बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांक यापैकी कोणताही नंबर येथे नमूद करा.
– त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक सर्व माहिती तुमच्या समोर येणार आहे.

source:- tv9 marathi

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व