Search
Generic filters

पीएम किसान ट्रॅक्टर योजना , ट्रॅक्टर खरेदी वर आता मिळणार 50% सबसिडी

पीएम किसान ट्रॅक्टर योजना

पीएम किसान ट्रॅक्टर योजना , ट्रॅक्टर खरेदी वर आता मिळणार 50% सबसिडी

 

krushi kranti : शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.

 

पीएम किसान ट्रॅक्टर योजना PM Kisan Tractor Yojana : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारच्या मशीनचीही गरज आहे. या गरजेमध्ये ट्रॅक्टर हा शेतकर्‍यांच्या गरजेचा भाग आहे. शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.

शेतात कामासाठी ते ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात अशा परिस्थितीत ते शेतात कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरू केलीय. ही योजना पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना म्हणून ओळखली जाते

 • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

पी एम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्रता व अटी

या योजनेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांनी मागील सात वर्षांमध्ये ट्रॅक्टर खरेदी केली असेल तर ते पात्र राहत नाही. तसेच महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अर्जदार शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. शेतकरी फक्त एक ट्रॅक्‍टर खरेदी करू शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा दुसर्‍या एखाद्या कृषि यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेणारा नसावा. तसेच कुटुंबातील फक्त एकच सदस्य अर्ज करू शकतो. योजना फक्त लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. मोठे जमीनदार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

हे पण वाचा:- पीएम किसान सम्मान निधि : ‘या’ तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराच्या आधार कार्ड
 • सातबारा, आठ अ उतारा इत्यादी शेतीची कागदपत्रे
 • अर्जदाराचे ओळखपत्र, मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी
 • अर्जदाराचे बँक अकाउंट पासबुक
 • अर्जदाराचा मोबाईल नंबर
 • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

50 टक्के अनुदान उपलब्ध

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.

हे वाचा:- What is crop insurance : पंतप्रधान पीक विमा योजना , कोणत्या पिकाला किती विमा मिळणार?

कसा फायदा घ्यावा?

केवळ 1 ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना शासन अनुदान देते. म्हणजेच 1 ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, जमीन कागदपत्रे, बँकेचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. या योजनेत शेतकरी जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्राला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

संदर्भ:- TV9 Marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

4 thoughts on “पीएम किसान ट्रॅक्टर योजना , ट्रॅक्टर खरेदी वर आता मिळणार 50% सबसिडी”

  1. देविदास सखाराम रेणुसे

   मला नविन ट्रॅक्टर घ्यायचा आहे. सबसिडीसाठी थांबावे लागेल का?

 1. कोनत्या लींकवर फार्म भराचा की फक्त याडच आहे व पहिले ते तीन कायदे हटवा मना मोदीजीले मग ट्रकटर द्या मना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *