7/12 Varas nond : उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

7/12 Varas nond : उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

7/12 Varas nond : उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

आपण दैनंदिन व्यवहारामध्ये अगदी सहज म्हणतो की वारसा हक्काने  जमिन मिळाली. मात्र, आजही वारसा हक्काची नोंद करायची कशी याची अनेकांना माहिती नसते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त आपण ऐकूण आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करायची कशी ? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. त्यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.

वारसा हक्काची तरतूद ही कायद्यातच करण्यात आलेली आहे. जमिन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 149 प्रमाणे हे तयार करण्यात आले आहे. ज्यावेळी वडिलोपार्जित संपत्ती नावावर करायची असते तेव्हा आजोबांच्याकडून वडिलांना आणि वडिलांकडून मुलाला संपत्ती मिळते. ज्यावेळी वडिलांचे निधन होते, त्यानंतर त्यांची संपत्ती वारसदाराला मिळते. यासाठी बरेच कागदोपत्री व्यवहार करावे लागतात.

अशी आहे प्रक्रिया

  1. सर्वात आधी मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला काढणे आवश्यक आहे. खेडेगावात हा दाखला ग्रामपंचायतमध्ये मिळतो, शहरी भागात हा दाखला नगरपालिका, महानगरपालिका जन्म-मृत्यू विभागात मिळतो.
  2. त्याआधी मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद होणे आवश्यक असते. 3 महिन्याच्या आत वारसा नोंदणी करण्यासाठी देणे आवश्यक आहे.
  3. यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे निधन किती तारखेस झाले, त्या व्यक्तीच्या नावावर कोणती जमीन आहे, एकूण वारसदारांची संख्या किती या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
  4. वारसा नोंद करताना निधन झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला काढून वारसा नोंदणीसाठी कर्ज करावा. रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि काही प्रतिष्ठित नागरिकांचे विचार घेऊन अर्जामध्ये लिहलेल्या माहितीची चौकशी केली जाते.
  5. वारसा फेरफार ठराव मंजूर करून नोंद घेतली जाते. त्यानंतर सर्व वारसदारांना नोटीस दिली जाते. 15 दिवसात याबाबत कायदेशीर आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद केली जाते. यासाठी लागणारी कागदपत्रे: मृत्यू प्रमाणपत्र, तलाठी अहवाल.

हे पण वाचा:- फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे: रेशन कार्ड प्रत, विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प असलेल्या अर्ज आणि शपथपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी.

बँक, विमा रक्कम इ. बाबत नॉमिनी (मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे लिहले असेल तर त्या व्यक्तीला ती रक्कम मिळू शकते.)

मृत व्यक्तीच्या नावावरील 8 अ चे उतारे, वारसदाराचे पत्ता इत्यादी. वारसदाराची नोंद करताना त्या व्यक्तीच्या धर्मानुसार वारसा कायद्याचे नियम लागू पडतात. अशा प्रकारे वारसाची नोंद केली जाते.

source:-tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *