Agriculture Research : कृषी विद्यापीठाचे संशोधन देईल शेतकऱ्यांना बळ – मंत्री दादा भुसे

agriculture research

Agriculture Research : कृषी विद्यापीठाचे संशोधन देईल शेतकऱ्यांना बळ – मंत्री दादा भुसे

 

 

महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती शेतीतून होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आढावा बैठकीत बोलताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, कृषी विभाग आणि सगळे शेतकरी हे सगळ्यांचे एक कुटुंब आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी संशोधन आणि त्या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचे शेतीच्या बाबतीतले संशोधन हे शेतकरी विकासाला बळ देणारे आहे. असे मत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे बोलताना भुसे म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आज पर्यंत चे कार्य हे शेतकऱ्यांसाठी फार मोठे आहे. agriculture in maharashtra

 

परंतु याही पुढे नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देऊन तसेच शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल असं सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी कमी दरात उच्च प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण विद्यापीठाच्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास असून त्याची मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे विद्यापीठांनी जास्तीत जास्त मूलभूत बियाण्यांचे उत्पादन वाढवावे.

 

तसंच जे शेतकरी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करतात अशा शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय ठेवावा. आता शेतकरी बाजारपेठेत ज्या मालाला मागणी आहे त्या नवीन पिकांची मागणी करीत आहेत त्यासाठी परदेशी भाजीपाला व फळे यावर कृषी विद्यापीठांनी आपले संशोधन करावे.

 

या संशोधनात कामे जर बाहेरच्या देशांमधून काही वाण आणण्याची गरज असली तर त्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून परवानगी देण्यात येईल. शासनाच्या विकेल ते पिकेल या संकल्पने खाली बाजारात असलेल्या मागणीनुसार वाहन विकसित करणे तसेच परदेशी पिकांचा संशोधनात अंतर्भाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे.

 

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या कास्ट कासम प्रकल्पाला भेट दिली. या आढावा बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ :- कृषीजागरण

 

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *