Search
Generic filters

‘कृषी विभागाचे आव्हाहन’ सर्व शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा

all-farmers-should-take-advantage-of-the-orchard-scheme

‘कृषी विभागाचे आव्हाहन’ सर्व शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा

 

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आले असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जळकोट( लातूर ) तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पर्यवेक्षक विशाल इंगळे यांनी केले आहे. त्याचबरोबर पवार यांनी माहिती देताना सांगितले की, नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना ही चालू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

 

 

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे

जमिनीचा सातबारा उतारा व आठ अ उतारा ( एकूण क्षेत्र हे दोन हेक्‍टरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे )
आधार कार्ड
राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
जॉब कार्ड
ग्रामपंचायत ठराव आवश्यक आहे

 

सलग फळबाग लागवड करण्यासाठी एक हेक्टर क्षेत्राला खालील प्रमाणे अनुदान मिळेल

1-आंबा कलमे – अनुदान दोन लाख 19 हजार 634
2- चिकू कलम – अनुदान एक लाख 58 हजार 890
3- पेरू कलमे – अनुदान दोन लाख 22 हजार 665
4- डाळिंब कलमे – अनुदान दोन लाख 43 हजार 135

लिंबू, संत्रा, मोसंबी – अनुदान एक लाख 48 हजार 873
सिताफळ कलम- अनुदान एक लाख 38 हजार 542

 

बांधावरील फळबाग लागवड एक हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना खालील प्रमाणे अनुदान मिळेल

आंबा कलम- अनुदान बत्तीस हजार 252
नारळ रोपे – अनुदान 21 हजार 442
पेरू कलमे – अनुदान दहा हजार 182
सीताफळ कलमे – अनुदान 6888
जांभूळ कलमे ( अनुदान 19,220
तसेच नाडेप खत उत्पादन युनिटसाठी एकूण अनुदान 15500 तर गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520 वरील प्रमाणे योजना चालू आहे.
या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे (कृषी विभागाचे) आव्हाहन तालुका कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे.

संदर्भ :- marathi.krishijagran.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “‘कृषी विभागाचे आव्हाहन’ सर्व शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *