Search
Generic filters

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजनासाठी अर्ज करावेत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आव्हान

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजनासाठी अर्ज करावेत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आव्हान

 

राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार पशुपालन करणारे शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्याच्या पशुसंवर्धन विभागानेविविध प्रकारच्या योजना व उपक्रम राबवूनग्रामीण भागातील अवस्था चक्र गतिमान ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना साठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

या उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी कटिबद्ध असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे आणि लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत असून शासनाच्या एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेले प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत वैध ठेवण्याची सोय केली आहे.

हे पण वाचा:- पंजाब डख हवामान अंदाज :-  ‘या’ तारखे पासुन थंडीचा जोर वाढणार!

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांच्या माध्यमातून दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे,शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांचा संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठीआर्थिक मदत करणे, शंभर कुक्कुट पिल्लांचे वाटप व 253 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबवली जाणार आहे.

या योजनांचा लाभ राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव आणि सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी घ्यावा व त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायची आव्हान पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट

https://ah.mahabms.com अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन चे नाव:AH-MAHABMS( गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध )

अर्ज करण्याचा कालावधी

4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 असणार आहे.

source:- कृषी जागरण

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजनासाठी अर्ज करावेत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आव्हान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *