टोळधाड आल्यानंतर अशी घ्या काळजी

टोळधाड आल्यानंतर अशी घ्या काळजी

१) टोळधाडीच्या आक्रमणावर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहेच शिवाय शेतकऱ्यांना त्या बद्दल सजगही केलं जात आहे.

२) टोळधाड बागांना तसेच इतर पिकांना नुकसान करणार, त्यासाठी आपल्या बागेत या किडीला थांबून न देता थाळीचा आवाज करून, ढोल-स्पीकर वाजवून, फटके फोडून, धूर करून, घाण कडवट वासाचे स्प्रे घेऊन आपल्या पिकापासून दूर ठेवता येते.

३) रासायनिक औषधांमध्ये क्लोरोपायरीफॉस २० % ई.सी १२०० एम.एल, डेल्टामेथ्रीन २.८ % ई.सी ६२५ एम.एल, डायप्लूबेन्जूरॉन २५ % डब्लू.पी १२० ग्राम. लेम्डासायलोथ्रीन ०५ % ४०० एम.एल, मेलाथिऑन ५० % ई.सी १८५० एम.एल यामधील कोणतेही एक औषध ५००-६०० ली. पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

४) ही टोळधाड रात्री ६.०० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास आगमन करते आणि सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान करते, त्यासाठी पहाटे ३.०० ते ७.३० च्या आधी वरील औषधांची फवारणी करून घ्याची आहे जेणे करून ही टोळधाड पुढे जाण्यापासून रोकता येईल.

५) टोळधाडी च्या झुंडी दिसून आल्या तर शेतकऱ्यांनी लगेच प्रशासनाला माहिती द्यायची आहे, त्याबरोबर योग्य प्रशिक्षण घेऊन कीड नियंत्रणात आणली जाऊ शकते. टोळधाड आल्यानंतर अशी 

टोळधाडीचे महासंकट! वाचा काय आहे टोळ धाड :-  https://www.krushikranti.com/blog/coronavirus-lockdown-india-now-battle-locust-attacks/

https://www.santsahitya.in/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *