Search
Generic filters

नाबार्डचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर!

नाबार्डचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर!

नाबार्डचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर!
राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचे निर्देश दिले जात असले तरी स्थानिक पातळीवर जिल्हा बॅंकेची काय अवस्था आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या (D.C.C) जिल्हा मध्यवर्ती बॅंका ह्या डबघाईला आलेल्या आहेत. अनेक बॅंक शाखा ह्या बंद असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये मात्र, शेतकरी हे कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे (NABARD) नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण उद्योग बॅंकेने पतपुरवठा सोसायट्यांना थेट कर्ज देण्यास मान्यता दिलेली आहे. यासंबंधीची माहिती शिखर बॅंकेचे प्रशासकीय मंडळाचे विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून कर्जाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गावस्तरावरील सोसायट्यांना पुन्हा महत्व

गावस्तरावर ना नाबार्डच्या बॅंक शाखा आहेत ना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या. केवळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी ह्या आजही गावस्तरावर आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने नाबार्डवर सोपवलेली आहे. त्यामुळे नाबार्ड आता कमी व्याजदराने सोसायट्यांना कर्जपुरवठा करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सोसायट्यांचे ठप्प असलेले व्यवहार पुन्हा सुरु होणार आहेत. जिल्हा बॅंकेतील व्यवहार ठप्प झाल्यानंतर सोसायट्यांमध्ये देखील मरगळ आली आहे. मात्र, नाबार्डच्या या निर्णयामुळे गावस्तरावरील सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज मिळणे शेतकऱ्यांच्याही सोईस्कर होणार आहे.

हे पण वाचा:-देशातील कापूस उत्पादन ३१० लाख गाठींवर स्थिरावणार

या ठिकाणच्या सोसायट्यांनाच मिळणार कर्ज

सोसायट्यांचे जाळे हे गावस्तरावपर्यंत असते. मात्र, ज्या ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंका अडचणीत किंवा डबघाईला आलेल्या आहेत अशाच ठिकाणच्या सोसायट्यांना कमी दरात कर्ज दिले जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय नाबार्डने घेतला आहे. ज्या भागातील जिल्हा बॅंका ह्या डबघाईला आलेल्या आहेत त्या भागातील सोसायट्यांनीही कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज घेण्यासाठी आता सोसायट्यांचा आधार मिळणार आहे. सहकार क्षेत्र पुन्हा गतिमान होणार असल्याचे सांगितले जात आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *