Search
Generic filters

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा मोठा निर्णय; देशात २७ किडनाशकांवर बंदी

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा मोठा निर्णय; देशात २७ किडनाशकांवर बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतात नोंदणीकृत किंवा वापरात असलेल्या २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचना १८ मे रोजी गॅझेटद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध १२ कीटकनाशके याचा समावेश आहे, ७ तणनाशके व ८ बुरशीनाशके यांचा समावेश करण्यात आला आहे.

मानवी आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी आदी सजीवांना असलेला धोका लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधित रसायना विरुद्ध विकसित झालेली प्रतिकार क्षमता, अवशेष समस्या आदी कारणांचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला. यावेळी त्याचे अहवाल निष्कर्ष व केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सीआयबीआरसी) अंतर्गत तज्ज्ञ समितीमार्फत कीडनाशकांचे झालेले फेरमूल्यांकन या आधारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या घेण्यात आलेल्या निर्णयावर हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी सरकारकडून ४५ दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे. त्या सूचना सहसचिव (पीक संरक्षण), केंद्रीय कृषी मंत्रालय, कृषी भवन, नवी दिल्ली येथे त्या पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. याचबरोबर परदेशांत या कीडनाशकांवर असलेल्या बंदीची कारणेही अभ्यासण्यात आली आहेत.केंद्रीय कृषी मंत्रालयाचा

हे आहेत बंद केलेली 27 कीटकनाशके 

1. Acephate -एसीफेट टाटा
2. Atrazine तणनाशक
3. Benfuracarb -कीटकनाशक,brake विलवूड चे
4. Butachlor -तणनाशक
5. Captan -कैफटाफ टाटा
6. Carbendazim -बविस्टीन
7. Carbofuran -दाणेदार कीटकनाशक ,मार्शल
8. Chlorpyriphos ,-कीटकनाशक घरडा केमिकल
9. 2,4-D -तणनाशक
10. Deltamethrin कीटकनाशक डेसिस
11. Dicofol -कोळीनाशक
12. Dimethoate रोगर
13. Dinocap केरेथिन
14. Diuron -तणनाशक
15. Malathion -कीटकनाशक
16. Mancozeb- M 45
17. Methomyl -लेनेट
18. Monocrotophos – नुवाक्रोनकीटकनाशक
19. Oxyfluorfen – गोल ,कांदे तणनाशक
20. Pendimethalin – तणनाशक स्टोम्प extra basf चे
21. Quinalphos- कीटकनाशक syngenta एकालक्स AF
22. Sulfosulfuron गहू तणनाशक
23. Thiodicarb -लार्विन कZीटकनाशक
24. Thiophanat emethyl रोको बुरशीनाशक
25. Thiram -बुरशीनाशक बीजप्रक्रिया
26. Zineb- Z- 78
27. Ziram.- कुमान L

ref:-https://agrowonegram.com/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *