‘शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता’ पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय – वाचा सविस्तर

big-decision-of-the-state-government-to-give-more-benefits-of-crop-insurance

‘शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता’ पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय – वाचा सविस्तर

 

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून (शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता) नवे धोरण आखले जात आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसून शेतकऱ्यांना  मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.

 

त्यानुसार राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी नफा आणि तोटा कॅपिंग सिस्टम आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आखत आहे. या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिक फायद मिळणार आहे. गेल्यावर्षी पीक विमा कंपन्यांनी 5800 कोटीपैकी केवळ 900 कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण केले होते. त्यामुळे सरकार विमा कंपन्याच्या मनमानीला चाप लावण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

 

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा
हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) हा लाभ मिळणार आहे. सध्याच्या घडीला हरियाणात 1,26,928 हेक्टरवर धान्याशिवाय इतर पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. अशा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

 

त्यासाठी शेतकऱ्यांना 25 जूनपर्यंत मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या (Mera Pani Meri Virasat Scheme) पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच एग्रो फारेस्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरात 400 झाडे लावली असतील तर त्यांना 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

 

मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना आपण किती एकरात पीक घेतले आहेत, ही माहिती नमूद करावी लागेल. या माहितीची पडताळणी केली जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. यामध्ये कोणतेही अडथळे येता कामा नये, असे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे झज्जर जिल्ह्यातील ढाकला गावातील शेतकऱ्यांनी यावेळी सामूहिकरित्या धान्याची शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हे पण वाचा :- तुमचा मोबाईल नंबर टाकून सातबारा उतारा कसा काढायचा ?

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *