केंद्र सरकारची योजना; शेती अवजारांसाठी मिळणार ८० टक्के अनुदान, असा मिळवा लाभ

केंद्र सरकारची योजना; शेती अवजारांसाठी मिळणार ८० टक्के अनुदान, असा मिळवा लाभ

 

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सतत काही ना काही नवीन योजना आणत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त आर्थिक भार सोसावा लागू नये. किसान सन्मान निधीसमवेत अशा बर्‍याच योजना आहेत, ज्याद्वारे शेतकरी शेतीव्यतिरिक्त आपले उत्पन्न वाढवू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने फार्म मशिनरी बँक (Farm Machinery Bank) एक योजना आणली आहे. यामुळे यातून शेतकरी स्वत:च्या शेती सोबत इतरांना मदत करू शकतील.

 

हे वाचा :- पीएम किसान ७ वा हप्ता येण्यापूर्वी ‘हि’ चूक करा दुरुस्त तरच येतील पैसे

 

काय आहे फार्म मशिनरी बँक योजना
सध्याच्या काळात यंत्राशिवाय शेती करणे अवघड आहे. परंतु प्रत्येक शेतकरी शेती करण्यासाठी शेतीची उपकरणे खरेदी करू शकत नाही. खेडे गावातही अनेक शेतकरी शेती उपकरणांपासून लांब आहेत. भाडेतत्वावर मशीनची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने खेड्या- पाड्यातील गावांसाठी मशिनरी बँक तयार केली आहे. यासाठी सरकारने वेबसाइट, मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकरी गट तयार केले आहेत

 

हे पण वाचा:- शेत जमीन खरेदी-विक्री नियम आणि कायदे सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा

 

सरकार देतेयं ८० टक्के अनुदान
तरूण फार्म मशिनरी बँक उघडू शकतात आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. हे मशिनरी बँक उघडण्यासाठी सरकार ८० टक्क्यांपर्यत अनुदानही देऊन इतर अनेक प्रकारे मदत करत आहे.

शेतकऱ्यांनी २० टक्के रकमेची करायची गुंतवणूक
केंद्र सरकार देशभरात ‘कस्टम हायरिंग सेंटर'(Custom Hiring Centre)  निर्माण करण्यास प्रोत्साहित करीत आहे. ५० हजारहून जास्त ‘कस्टम हायरिंग सेंटर’ बांधले गेले आहेत. फार्म मशिनरी बँकेसाठी, शेतकऱ्याला एकूण खर्चाच्या केवळ २० टक्के गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण ८० टक्के खर्च अनुदानाच्या रुपात शेतकऱ्याला परत मिळेल. हे अनुदान १० लाख ते १ कोटी रुपये देण्यात येणार आहे.

 

हे पण वाचा:- आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा

 

सब्सिडी ३ वर्षात फक्त एकदा मिळणार
अनुदानावर शेतकरी आपल्या फार्म मशीनरी बँकेत बियाणे, धान्य पेरण्याचे यंत्र, नांगर, मळणी, रोटावेटर यासारखी मशिनरी घेऊ शकतात. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेच्या यंत्रणेवर ३ वर्षांतून एकदाच अनुदान दिले जाईल. एका वर्षात, शेतकरी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन किंवा मशीनवर अनुदान घेऊ शकतो.

 

हे वाचा:-  हवामानात मोठा बदल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

 

फार्म मशिनरी बँकेसाठी असा करा अर्ज
फार्म मशिनरी बँकेसाठी आपल्या क्षेत्रातील ई-मित्र कियोस्क वर असणारी फी भरून शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करावा लागेल. अनुदानाच्या अर्जासोबत आणखी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्यात मशिनरी बिलाची छापीलप्रत, आधार कार्ड, बँक खाते पासबुकची प्रत द्यावी लागेल.

संदर्भ:- https://agrowonegram.com/

https://www.santsahitya.in/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “केंद्र सरकारची योजना; शेती अवजारांसाठी मिळणार ८० टक्के अनुदान, असा मिळवा लाभ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *