Search
Generic filters

Chilly Rates : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, ‘या’ जिल्ह्यात लवंगी मिरचीचा तडका

Chilly Rates : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, 'या' जिल्ह्यात लवंगी मिरचीचा तडका

Chilly Rates : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, ‘या’ जिल्ह्यात लवंगी मिरचीचा तडका

 

अतिवृष्टी आणि बदलेल्या वातावरणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला असला तरी मिरचीच्या केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही तर सातारा बाजारपेठेत आवक वाढूनही दर हे चढेच आहेत. बाजारात शेतीमालाची आवक वाढली की दर कमी होणार हे सुत्रच आहे पण याला देखील मिरचीने छेद दिला आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे. दर वाढूनही मागणी वाढत आहे हे विशेष.

सातारा बाजारपेठेत 4 प्रकारच्या मिरचीचा ठसका

आता सर्वच बाजारपेठेत मिरच्यांची आवक सुरु झाली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी मिरचीची आवक वाढत आहे. असे असले तरी दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवाय दरात वाढ होत आहे. लवंगी मिरचीच्या दरामध्ये तर 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे यंदा मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. सातारा बाजारपेठेत बेडगी मिरची 320 रुपये किलो, शंकेश्वरी मिरची- 200, गटूर मिरची- 165, लवंगी मिरची 180 ते 200 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

हे पण वाचा:- आंबा बागांचे नुकसान तरीही फळपीक विमा योजनेकेडे शेतकऱ्यांची पाठ, ही आहेत कारणे?

अवकाळीचा परिणाम पण आवकमध्ये वाढच

अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मिरची तोडल्यानंतर वाळवण करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण याचा थेट परिणाम हा उत्पादनावर झालेला नाही. यापूर्वी नंदुरबार बाजारात चालू महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच

नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *