“या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाली भरपाई: वाचा सविस्तर”
नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत गारपीट, अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ९ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी दिला आहे.
हा निधी सहा तालुक्याला वितरित करण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
वाचा :- “२ गाई किंवा २ म्हशीला मिळणार ७५ टक्के अनुदान”
जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे – २०२० या कालावधीमध्ये गारपीट तसेच अवेळी पाऊस झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळी शेतीपिकांसह बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाद्वारे शासनाला कळवला होता. यात फेब्रुवारी व मार्च २०२० या कालावधीत नुकसान झालेल्यांना सात कोटी १५ लाख ४ हजार ४९०, एप्रिलमध्ये नुकसान झालेल्यांना दोन कोटी ३२ लाख ६६ हजार ४१० रुपये तर मे २०२० मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार लाख ७६ हजार शंभर रुपये मिळाले.
दरम्यान, हा निधी संबंधित तालुक्यांना वितरित करण्यात आला. हा निधी तालुका स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली. “या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त “या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त
तालुकानिहाय प्राप्त निधी
नांदेड तालुक्यासाठी २१,६०० रुपये, कंधार तालुक्यासाठी २१ कोटी ४५ लाख ६०० रुपये, लोहा तालुक्यासाठी १ कोटी ६० लाख ७४० रुपये, बिलोली १ कोटी ६३ लाख ५० रुपये, मुखेड १ लाख ८५ हजार ७६० रुपये, हदगाव ७ कोटी २५ लाख ४३ हजार ७५० रुपये, माहूर ४,५०० हजार असा एकूण ९ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.