Search
Generic filters

cotton rate : कापूस दरवाढीला ब्रेक, आता साठवणूक की विक्री..!

cotton rate : कापूस दरवाढीला ब्रेक, आता साठवणूक की विक्री..!

cotton rate : कापूस दरवाढीला ब्रेक, आता साठवणूक की विक्री..!
यंदाच्या हंगामात बाजारपेठेतली सुत्रे बदलायला भाग पाडणाऱ्या  कापसाचे दर हे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत. नेमकं मागणी असतानाही अशी परस्थिती का ओढावली असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल पण सध्याच्या  युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिर झालेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये कापसाला विक्रमी असा 11 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, सध्या कापूस हा 8 ते 10 हजार दरम्यान स्थिरावलेला आहे. त्यामुळे  कापसाची साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतू, युध्द थांबल्यानंतर पुन्हा बाजारपेठेतले दर सुधारतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सध्याची परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी बघ्याची भूमिका घेऊन योग्य वेळ येताच विक्री करणे उचित ठरणार आहे.

युध्दजन्य परस्थितीचा नेमका परिणाम काय?

रशिया आणि युक्रेन यांच्यात युध्दाला सुरवात होताच कापसाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. पण पुन्हा स्थिरावले आहेत. युध्द हे दोन देशातच असल्याने जगभरातील बाजारपेठेवर परिणाम होईल असे चित्र नाही. त्यामुळे आता घसरण तर होणार नाही पण भविष्यात कापसाचे दर वाढणार आहेत. हे युध्द जागतिक पातळीवर पसरते की काय अशी परस्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठेतही अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, फंडामेंटल्स कापूस दरवाढीसाठी पोषक असल्याचे सांगितले जात आहे.

दर घसरले पण मागणी होताच वाढलेही

विश्व युध्द होण्याच्या भीतीने मध्यंतरी कापसाचे दर हे घसरले होते. मात्र, ही घसरण तात्पूरती होती. आता मागणी सुरु होताच पुन्हा जैसे थे परस्थिती झाली आहे. यंदा मूळ उत्पादनातच घट झाली आहे. त्यामुळे दरवाढ होणार हे निश्चित आहे. देशांतर्गत बाजारपेठेत अजूनही मागणी टिकून आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच दर होती असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनची आवक वाढली, पण दराचे काय?

असा झाला दरात फरक

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापासाला अधिकचा दर आहे. मात्र, या परस्थितीमुळे 8 ते 10 हजार 500 वर असलेला कापूस गत आठवड्यात 4 ते 7 हजारापर्यंत आला होता. यानंतर मात्र, कापूस दराने पुन्हा पुर्वतातळी ही गाठलेली आहे. यंदाच्या हंगामात गेल्या 10 वर्षात जो दर मिळाला नाही तो मिळाला आहे. शिवाय मागणीत घट झालेली नाही. केवळ निर्माण झालेल्या परस्थितीचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता टप्प्याटप्याने विक्री केली तर अधिकचा फायदा होणार आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.