Search
Generic filters

Subsidy to farmers : शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी ‘इथं’ करा लवकरात लवकर अर्ज!

Subsidy to farmers : शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी 'इथं' करा लवकरात लवकर अर्ज!

Subsidy to farmers : शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी ‘इथं’ करा लवकरात लवकर अर्ज!

 

दूग्ध व्यवसाय हा शेतीचा मुख्य जोड व्यवसाय आहे. शेती उत्पादनाच्या बरोबरीने दूध व्यवसायातून उत्पन्न मिळते. शिवाय याकरिता वेगवेगळ्या योजनाही शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. आता नव्याने अनुदानावर दूधाळ गाई-म्हशीचे वाटप योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने ही योजना आता सुरु केली आहे. केवळ या आर्थिक वर्षात ही योजना काही जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार नाही.

अशी असणार आहे अनुदानाची रक्कम

दोन दूधाळ जनावरे घेण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 75 टक्के तर स्वहिस्सा अनुसूचीत जाती 25 टक्के, शासकीय अनुदान सर्वसाधारण 50 टक्के, स्वहिस्सा सर्वसाधारण 50 टक्के असे अनुदान राहणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे,केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय!

अनुदान लाभासाठी अटी-नियम

दूध उत्पादन वाढीच्य़ा अनुशंगाने विचार करुन पशूसंवर्धन विभागाने संकरीत गाय, जर्सी, मुऱ्हा तसेच जाफराबादी यांचा समावेश राहणार आहे. तर देशी गाय, गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातीच्या गाई करिता अनुदान दिले जाते. 4 डिसेंबरपासून या योजनेला सुरवात झाली असून 18 डिसेंबरपर्यंत अर्ज हे भरले जाणार आहेत.

हे आहेत लाभार्थी निवडीचे निकष

यामध्ये वैयक्तिक पातळीवरही योजनेचा लाभ घेता येतो. शिवाय महिलांचा बचतगट असेल त्यांनाही अनुदानावर जनावरांची खरेदी करता येते तसेच अल्प भूधारक म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे क्षेत्र असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर या अनुदानाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम तर मिळणारच आहे. पण विकासाच्या दृष्टीने हे वेगळे पाऊस राहणार आहे. याकरिता रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:- सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’, सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम!

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

लाभर्थ्यास स्वताचा फोटो, आधारकार्ड, रेशन कार्ड नंबर, सातबारा, 8 अ, अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाण पत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रेही अदा करावी लागणार आहेत.

ही आहे अधिकृत वेबसाईट

https//ah.mahabms.com या पशूसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन केल्यास योजनेची माहिती आणि लाभर्थ्याने भरावयाची माहिती ही समोर असणार आहे. विचारण्यात आलेली माहिती भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज पशूसंवर्धन विभागाकडे द्यावा लागणार आहे.

source:- tv9

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “Subsidy to farmers : शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी ‘इथं’ करा लवकरात लवकर अर्ज!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *