Search
Generic filters

महत्त्वाची बातमी रब्बीसाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू 

महत्त्वाची बातमी रब्बीसाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू 

महत्त्वाची बातमी रब्बीसाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू

 

रब्बी हंगाम २०२०-२१ वर्षासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू ( बागायत ) , ज्वारी ( जिरायत ) , हरभरा व उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग ही पिके विमा योजनेंतर्गत घेण्यात आली आहेत.

 

मुंबई:- रब्बी हंगाम २०२०-२१ वर्षासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे . रब्बी हंगामातील गहू ( बागायत ) , ज्वारी ( जिरायत ) , हरभरा व उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग ही पिके विमा योजनेंतर्गत घेण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत – जास्त शेतकन्यांनी घ्यावा , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांकरिता व अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे . कुळासह कोणतेही शेतकरी सहभागी होवू शकतात.

वास्तवदर्शी विमा आकारणी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा आहे . सर्व पिकासाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न ( नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्षे वगळून ) गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल, ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

हे पण वाचा:- कसा काढायचा डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ ; मग हे वाचा

अधिक माहितीसाठी शेतक – यांनी तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी , ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक , सर्व सुविधा केंद्र ( सी.एस.सी. केंद्र ) किंवा संबंधित राष्ट्रीयकृत बैंक , वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

अशी आहे मुदत

शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी व बिगर कर्जदार शेतकन्यांनी स्वतः त्याचे विमा प्रस्ताव ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर , गहू व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर पूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३० मार्च २०२१ पर्यंत मुदत आहे.

 

जोखीमस्तर आणि हप्ता

 

गहू ( बागायती ):- जोखीमस्तर ७० टक्के , विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये , विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ५७० रुपये हेक्टर याप्रमाणे राहील .

 

ज्वारी ( जिरायती ):- जोखीमस्तर ७० टक्के , विमा सरक्षित रक्कम २८ हजार रुपये , विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ४२० रुपये हेक्टर याप्रमाणे राहील ,

 

हरभरा:- जोखीमस्तर ७० टक्के , विमा सरक्षित रक्कम ३५ हजार रुपये , विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ५२५ रुपये हेक्टर याप्रमाणे राहील.

 

भुईमूग:- जोखीमस्तर ७० टक्के , विमा संरक्षित रक्कम ३० हजार ५०० रुपये , विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ४७५.०० रुपये हेक्टर याप्रमाणे राहील. महत्त्वाची बातमी

ref:- www.agrowon.com

https://www.santsahitya.in/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व