Search
Generic filters

प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

 

रब्बीच्या पेरणी दरम्यान आणि आता पीके बहरात असताना पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहत आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली तरच  रब्बी हंगामातील पीके बहरत राहणार आहेत. अन्यथा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा आणि गव्हावर होणार आहे. त्यामुळे अळीचा आणि वाढत्या बुरशीचा बंदोबस्त हा शेतकऱ्यांना करावाच लागणार आहे. शिवाय खरीप हंगामातील तूर आणि कापसाचीही काढणी करुन साठवणूक महत्वाची राहणार आहे.

गव्हावर तांबोरा तर उर्वरीत पिकांना अळीचा धोका

पावसामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे गहू या रब्बी हंगामातील मुख्य पिकावर तांबोऱ्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण 2:1 ठेवावे. पिकास पाणी देताना बेताने व गरजेपुरतेच द्यावे. रोगाचे लक्षण दिसून येताच 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम- 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच अशाप्रकारे फवारणी केली तर त्याचा परिणाम होणार आहे.

 हे पण वाचा:- अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

बुरशीनाशकाची फवारणी

रब्बी हंगामातील पिकांच्या बुडाशी पाणी साचून राहिले किंवा वातावरणात दमटपणा आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुरशीनाशक म्हणून अॅडक्झेर हे औषध प्रभावी राहणार आहे. 15 लिटर पंपासाठी 30 मिली औषेध पाण्यात मिसळावे लागणार आहे. या मिश्रणात एक एकरामधील फवारणी होणार आहे. तर बीएसएफ चे ओपेरा हे एक बुरशीनाशक महत्वाचे ठरणार आहे. याचे प्रमाण देखील अॅडेक्झेर प्रमाणेच ठेवावे लागणार आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत असताना पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी आणि नंतरचे चार दिवस पिकांची काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे.

कापूस वेचणी अन् साठवणूक महत्वाची

खरीप हंगामातील कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात आहे. अधिकतर प्रमाणात काढणी झाली आहे. मात्र, फरदडचे उत्पादन काही शेतकरी हे घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा न करता शेतकऱ्यांनी फरदड कापूस काढला पाहिजे तर वेचलेल्या कापसाची योग्य ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. वेचणी झाल्यावर लगेच कापसाची झाडे ही शेताबाहेर काढून टाकावीत. तरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे. या बाबी क्षुल्लक असल्या तरी थेट पिकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *