Search
Generic filters

सोयाबीन वरील रोग व उपाय

सोयाबीन वरील रोग व उपाय

सोयाबीन वरील रोग व उपाय

 

१ ) खोडमाशी:

या किडीचा प्रादुर्भाव पिकांचे रोपावस्थेत झाल्यास त्याचा ताटावे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची पुन : पेरणी किंवा उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता असते. प्रौढ माशा लहान, चमकदार काळयाअसून त्यांची लांबी ३ मि.मी. असते अंडयातून निघालेली व पाय नसलेली २-४ मि.मी. लांब अळी प्रथम सोयाबिनची पाने पोखरते आणि पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.

खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते . मोठया झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडावर खोडमाशीचे अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशी अळी तसेच कोष फाद्यांत, खोडात असतो. शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के पर्यत घट येते. सोयाबीन वरील रोग व उपाय (Diseases and remedies on soybeans)

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

नियंत्रण: फोरेट १० किलो प्रति हेक्टर पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून द्यावे . तसेच केंद्रीय किटकनाशक (Pesticides) मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे क्लोरॅनट्रानिपोल १८.५ एस.सी. २ मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के ई . सी . १५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

२ ) चक्रभुंगा (Chakrabhunga) :

मादी भुंगा, पानावे देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. यामध्ये मादी तीन छिद्र करते. आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. त्यामुळे चक्राचे वरचा भाग वाळतो.

अंडयातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. अळी १ ९ ते २२ मि.मी लांब, दंडगोलकृती, गुळगुळीत, पिवळसर रंगाची असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात. पूर्ण वाढलेली अळी पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबिनवर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.

नियंत्रण : किडीची आर्थिक नुकसानीची पातळी सोयाबिन पिकात फुलोऱ्यापूर्वी  ३-५ चक्रभुंगा प्रति मिटर ओळीत आढळल्याबरोबर प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा थायक्लोप्रिड २१.७ ए.सी १५ मि.ली. किंवा इथिलॉन ५० ई.सी. १५-३० मि.ली. किंवा क्लोस्ट्रॅनिलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मि.ली. किंवा प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

३ ) हिरवी उंटअळी (Green camel) :

अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक करते. यामुळे ही कीड सहज ओळखता येते. अंडयातून निघालेल्या उंट अळया प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात तर मोठ्या अळ्या पानाचा सर्व भाग खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि अळ्या फुलांचे शेंगाचे नुकसान करतात.

नियंत्रणः पिकाचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी ४ लहान अळया प्रति मिटर ओळीत आढळल्यास प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंचा क्लोस्ट्रेनिलीप्रोल १८.५ इ.सी ३ मि.ली किंवा इन्डोक्सीकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४ ) तंबाखूची पाने खाणारी अळी (Tobacco leaf-eating larvae) :

बहुजातीय पिकांचे नुकसान करणा – या या किडीचा ऑगस्ट महिन्यात सोयाबिनच्या पिकावर मुख्यत्वे प्रादुर्भाव आढळतो . तंबाखूची अळी मळबाट हिरव्या रंगाची असून तिच्या शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात.

पूर्ण वाढलेली अळी ३०-४० मि.मी. लांब असते. मादी पतंग पुजक्याने पानावर अंडी घालतो. अंडयातून निघालेल्या अळया सामूहिकपणे पानाचा हिरवा पदार्थ खातात. त्यामुळे पाने जाळीदार पानाचे मागे पुष्कळ लहान अळया असतात. तृतीय असस्थे पासून अळया अलग अलग होऊन तंबाची पाने आणारी ही सोयाबिनची पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पाने राहत नाहीत.

नियंत्रणः या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलावर येण्यापूर्वी ३-४ लहान अळया प्रती मिटर ओळीत आवळल्यास इन्डोक्सीका १५.८ ए.सी. ६.६ मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . सोयाबीन वरील रोग व उपाय

हे पण वाचा:- मूग उडीद पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन

५ ) केसाळ अळी (Hairy larvae)

पूर्ण वाढलेली अळी ४० ते ४५ मि.मी  लांब असून तिची दोन्ही टोके काळी तर मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंडयातून बाहेर पडलेल्या लहान अळया अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरतात व पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भावात त्या झाडाचे खोडच शिल्लक ठेवतात आणि दुसऱ्या शेताकडे प्रयाण करतात.

या अळीचा पतंग पुंजक्यात अंडी घालतो आणि त्यातून निघालेल्या असंख्य अळ्या द्वितीय अवस्थेतपर्यंत त्याच पानावर राहतात व पानातील हिरवा भाग खातात. म्हणून अंडीपूज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील असंख्य अळ्यांसह गोळा करून केरोसीन मिश्रीत पाप्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाचे लहान अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा पिकावर विपरीत परीणाम होतो.

६ ) पाने पोखरणारी अळी (Leaf-eating larvae) :

पूर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मी. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो. अळी फिक्कट हिरव्या रंगाची, गर्द डोक्यावी असून सुरुवातीस सोयाबिनची पाने पोखरते, त्यामुळे कीडग्रस्त पान आकसते . पुढे अळी पानाची गुंडाळी करुनच पानाचा हिरवा भाग खाते . पानाचे गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते .

नियंत्रण : या किडीचे नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २ टक्के भुकटीवी २० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे पुरकणी करावी

 

रस शोषण करणाचा किडी (Insect absorbing juice)

 

१ ) पोटी माशी :

रस शोषण करणाऱ्या गटातील ही महत्त्वाची कीड आहे. प्रौढ माशी १-२ मि.मी. आकाराची, फिक्कट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणचट पातळ थर असतो. पांढन्या माशीचे प्रौढ आणि पिल्ले पानाचे मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकाची वाढ खुंटत, पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळातात.

रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थबाहेर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याचे प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी पांढरी माशी सोयाबीनचे मोडक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे पाने पिवळी पडून उत्पादनात मोठया प्रमाणात घट येते.

नियंत्रण : या किडीचे नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किटकनाशकाची फवारणी करावी.

 

रोग व त्याचे व्यवस्थापन (Disease and its management) सोयाबीन पीक खत व्यवस्थापन

 

१ ) पानावरील जिवाणूचे ठिपके :

लक्षणे व परिणाम झाडांच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करडया ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्याचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात, आर्द्ध हवामानात रोग झपाटयाने वाढतो.

नियंत्रणाचे उपायः पिकावर ३० वॉम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक १ गॅम स्ट्रेप्टोसायक्लीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार १५ दिवसाये अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

हे पण वाचा:- तुर पीक वरील शेंगा पोखरणाऱ्या कीड व त्यांचे व्यवस्थापन

२ ) पानावरील कुरशीजन्य ठिपके :

लक्षणे व परिणाम : झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकरमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळातात. कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात. आद्र हवामान रोग प्रसारास अनुकूल ठरते.

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम अधिक १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ३ ग्रॅम थायरम लावावे .

२ ) रोग दिसून येताच पिकावर १० ग्रॅम कार्बन्डाझिम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अथवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम , १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

३ ) तांबेरा (Tambera) :

लक्षणे व परिणाम : रोगाची लागण झाल्यास पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिक्कट काळपट , लोखंडी गंजाव्या रंगाचे , सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात. रोगाचा जास्त प्रकोप झाल्यास पाने गळून पडतात. शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात. आणि उत्पादनात लक्षणीय घट येते.

नियंत्रणाचे उपाय :

१ ) प्रतिबंधक जातीचा पेरणीकरिता अवलंब करावा.

२ ) प्रोपीकोनाझोल २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४ ) शेंगेवरील करपा :

लक्षणे व परिणाम : पाने, खोड आणि शेगावर अनियीमत आकारावे भुरकट ठिपके पडतात आणि त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशी फळे दिसून येतात . बी तयार होण्याच्या प्रक्रियेत विपरीत परीणाम होतो . पाने, खोड शेंगामध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहते.

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन + थायरम ( मिश्र  घटक ) ची २-३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी .

५ ) मूळ आणि खोडसड : 

लक्षणे व परिणाम : रोपावस्थेत रोगाची लागण जास्त दिसून येते . रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते . खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्न पुरवठा होत नाही .

त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात . अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात . रोगट खोडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे ( स्केलेरोशिया ) दिसून येतात जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस रोगाच्या प्रसाराला पोषक ठरते .

नियंत्रणाचे उपाय :

१ ) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन + थायरम ( मिश्र घटक ) ची २-३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी .

२ ) जमिनीत निंबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत .

६ ) कॉलर रॉट :

लक्षणे व परिणाम : झाडाचे मूळ व खोड यांच्या खोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते . तसेच बुरशी बीजे ही आढळून येतात . पुढे झाडाच्या या भागाची सड होते . झाड सुकते व मरून जाते . पण मोठ्या अवस्थेत झाड पिवळे पडते व नंतर मरते .

नियंत्रणाचे उपाय

१ ) पेरणीपूर्व कार्बोक्सीन + थायरम ( मिश्र घटक ) ची २-३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी .

२ ) शेतातील काडी कचरा वेचून नष्ट करावा तसेच लागण झालेली झाडे उपटून काढावी व शेताबाहेर नेऊन जाळावीत .

७ ) मोझॅक :

लक्षणे व परिणाम : रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते . पाने आखूड , लहान जाडसर व सुरकुतलेली होतात . अशा झाडांना शेंगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्या सापडतात . रोगप्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो .

नियत्रंणाचे उपाय : माध्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

८ ) पिवळा मोझॅक :

 

लक्षणे व परिणाम: रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिखट तर काही भाग पिवळसर दिसून येतो . शेडयाकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात . पांढन्या माशीद्वारे रोगप्रसार होतो .

नियत्रणाचे उपाय : पांढ – या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

 

सोयाबिगवरील किडींचे व रोगांचे एकिकृत व्यवस्थापन (Integrated management of pests and diseases on soybeans)

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपमर , गुळकूज , खोडकूज शेंगावरील करपा , सूक्ष्मजिवाणूचा करपा इत्यादी रोग तसेच खोडमाशी , चक्रभुंगा , पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळतो .

रासायनिक बुरशीनाशकाची व किटकनाशकाचा दुष्पपरिणाम तसेच त्याचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे व किडीवे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यासाठी रोग व किडी या करिता एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते .

१ ) सोयाबिनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी . त्यामुळे बुरशीची बीजे , तंतू तसेच बुरशीवे फळे या रोगांचा आणि किडीचे अवस्थांचा पक्षाद्वारे तसेव उष्णतेमुळे आणि जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो .

२ ) सोयाबिनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवडयापर्यत संपवावी .

३ ) विषाणूमुक्त निरोगी पिकाचे बियाणे वापरावे ,

४ ) पेरणीसाठी कीड रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची निवड करावी .

५) पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशी जसे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी ,

६ ) पिकाचे सुरुवातीचे असस्थेत शेत तणमुक्त ठेवावे . बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतीचा नाश करावा .

७ ) शेतात अगदी सुरवातीला रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी .

८ ) चक्रभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडगारत पाने , फांद्या वाळतात . म्हणून किड्यास्त झाडे वाळलेल्या फांद्या , पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा .

९ ) केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणाऱ्या अळयांचा लहान जाळीदार असतांना पानांसह नायनाट करावा ,

१० ) सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताच कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत . तसेच आवश्यकतेनुसार रोगा तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी .

११) सोयाबिन पिकनंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये .

१३ ) पिकाचा फेरपालट करावा. सोयाबीन वरील रोग व उपाय

संदर्भ:- महाराष्ट्र कृषी विभाग

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *