शेवगा लागवड माहिती

शेवगा लागवड माहिती

शेवगा लागवड माहिती

पिकाची माहिती

शेवगा हें पीक भाजी या प्रकारात मोडले जाते. भरपूर उत्पादन देणारे व कमी खर्चाचे पीक आहे. मार्केट ला मागणी भरपूर असते. शेवग्याला खूप देशातून मागणी आहे. यूरोप, जपान, अमेरिका, रशिया, आखाती अशा देशातून मागणी आहे. शेवगा हिरवागार असून ३० ते ४५ से.मी लांबीच्या माध्यम जाडीच्या व गोल आकाराच्या असाव्यात. शेवगा लागवड माहिती Drumstick tree planting information

जमिनीचा प्रकार

हलक्या ते भारी, माळरान, डोगरउताराच्या जमिनी, चोपण जमिनीत लागवड केली जाते.

हवामान

शेवगा सर्व हवामानात येणारे पीक आहे. याला सर्व साधारण २५ ते ३० से. तापमानात वाढ चांगली होते.

शेवगा पिकाची जात

कोईमतूर १,२, कोकण रुचिरा, पि.के एम -२

शेवगा लागवड

पावसाळी लागवड करण्यापूर्वी ६०X६०X६० से मी च्या खड्डे करून घेणे व बहू वार्षिक लागवडीसाठी ४x ४ मीटर वर लागवड करावी व १ वर्षीय वाणांसाठी २.५ x २.५ सेमी वर लागवड करावी.

शेवगा खत व्यवस्थापन

खड्ड्यात १ घमेले कुजलेले शेणखत, २५० गरम सुफला व ५० गरम फोलिडोल पावडर टाकून खडे भरून घ्यावे तसेच दरवर्षी प्रति झाडाला १० किलो शेणखत, ४७० गरम सुपर फोस्फट, १२५ गरम म्युरेट ही खते द्यावीत.

पाणी व्यवस्थापन

जमिनीच्या मगदूरा नुसार पाणी दयावे तसेच फुल व शेंगा लागणीच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घावी.

शेवगा  रोग नियंत्रण

शेवग्या वर जास्त असे किडी रोग होत नाहीत. परंतु जैविक कीटकनाशकांचा आणि सौम्य रासायनिक औषधाचा वापर करावा.

शेवगा उत्पादन

शेवग्याची लागवड केल्यापासून 6 महिन्यानंतर शेंगा लागतात. शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी खूप टणक झाल्यास शेंगाची चव कमी होते. लागवड केल्या पासून ८ ते १० महिनाय्नी शेंग काढणीस येते. सरासरी प्रत्येक झाडापासून ३० ते ४० किलो हिरव्या शेंगा मिळतात. शेवगा लागवड माहिती

https://www.santsahitya.in/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *