‘या’ दोन कागदपत्रावरच होणार ई-केवायसी
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11 व्या हप्त्याची चर्चा आता बांधापासून ते थेट प्रशासकीय यंत्रणेमध्ये होऊ लागली आहे. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वी ज्यांना 10 हप्त्याचा लाभ मिळाला आहे त्यांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. 11 हप्ता जमा होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. हे स्पष्ट झाले असले तरी यासंदर्भात वेगळी माहिती ही वेबसाईटवर देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्डसाठी देण्यात आलेला मोबाईल क्रमांक माहिती असणे गरजेचे आहे. या दोन गोष्टीच्या आधारे केवायसी पूर्ण करता येणार आहे. यासंदर्भात 10 वा हप्ता जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. आता दुरुस्तीनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी अपडेट केलेली नाही त्यांना 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शिवाय एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
पीएम किसानच्या वेबसाईटवर काय आहे माहिती?
‘ई-केवायसी’ करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार क्रमांक आणि आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. यापैकी एकही नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक शेतकऱ्याकडे नसेल तर तो जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अपडेट करून घ्यावा लागणार आहे. यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया सहज पूर्ण होईल. पीएम किसानच्या ईकेवायसीची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मोबाइल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे
असे करा ई-केवायसी प्रक्रिया!
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. पेजच्या उजव्या बाजूला ईकेवायसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करण्याची गरज आहे. आपण क्लिक करताच एक नवीन पृष्ठ उघडेल. इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक केलं तर मोबाइल नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल.मोबाइल आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर 4 आणि 6 अंकांचे दोन ओटीपी तुमच्या मोबाईलवर येतील. ते टाकून, आपल्याला सबमिट फॉर ऑथेंटिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर सर्व काही ठीक झाले, तर शीर्षस्थानी यशस्वीरित्या लिहिलेले ईकेवायसी असेल. तसे न केल्यास अमान्य असे लिहिले जाईल.
हे पण वाचा:- खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय
केव्हा मिळणार 11 वा हप्ता?
जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी 10 हप्ता मिळाला आहे. यानंतर मात्र, योजनेचे स्वरुप बदलत आहे. यामध्ये नियमितता साधण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होत आहेत. जे शेतकरी आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाचे अधिकारी राबत आहेत. पी. एम किसान योजना सुरू होऊन 3 वर्षे झाली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना पैशाचे 10 हप्ते मिळाले आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात 2 हजार रुपयांचा 11 वा हप्ता देण्यात येणार आहे.
source:- tv9 marathi
2 thoughts on “‘या’ दोन कागदपत्रावरच होणार ई-केवायसी”
अगोदर ज्या शेतकरी ला एक पन हप्ता आला नहि त्यांच् पहा कही
अगोदर ज्या शेतकरी ला एक पन हप्ता आला नहि त्यांच् पहा कही