Search
Generic filters

पीएम किसान योजना : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता!

पीएम किसान योजना : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता!

पीएम किसान योजना : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता!

 

पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता.

हे पण वाचा:- सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- sakal

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “पीएम किसान योजना : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *