Search
Generic filters

Pm kisan yojana : ‘या’ महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा अकरावा हफ्ता!

Pm kisan yojana : 'या' महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा अकरावा हफ्ता!

Pm kisan yojana : ‘या’ महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा अकरावा हफ्ता!

 

पीएम किसान सम्मान निधि योजना ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. एक जानेवारीला या योजने अंतर्गत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना दहावा हप्ता देण्यात आला होता. विशेष म्हणजे या योजनेचा हा दावा हप्ता भारताचे यशस्वी पंतप्रधान  माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या कर्क मला द्वारे पात्र शेतकर्‍यांना हस्तान्तरीत करण्यात आला. राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना देखील दहावा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

सध्या प्रसार माध्यमांमध्ये या योजनेच्या अकराव्या हफ्त्याविषयी मोठी चर्चा रंगली आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील या योजनेच्या अकराव्या हफ्त्याविषयी मोठी उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांनुसार, आगामी काही दिवसात पीएम किसान सम्मान निधि योजनेचा अकरावा हप्ता  देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यां शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये रंगत असलेल्या अकराव्या हप्त्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांना अकरावा हप्ता लवकरच मिळेल अशी आशा आहे.

हे पण वाचा:- शेती आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ घोषणांचा पाऊस?

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेद्वारे पात्र शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा तीन हप्त्यांत दिले जातात. त्यामुळे अकराव्या हत्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे या योजनेतून आत्तापर्यंत पात्र शेतकर्‍यांना सुमारे 20 हजार रुपयांची मदत केली गेली असल्याचे समजत आहे.

मात्र आता या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा अकरावा हप्ता नेमका कधी येईल याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार असल्याने या योजनेचे पात्र शेतकरी मोठे आनंदी असल्याचे यावेळी बघायला मिळाले.

source:- कृषी जागरण

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.