शेतकऱ्यांनो सोयाबीन बियाणे दक्ष रहा..! – उत्तम पुणे

सोयाबीन बियाणे माहिती

शेतकऱ्यांनो सोयाबीन बियाणे दक्ष रहा..! – उत्तम पुणे

 

येत्या २०२१ चे खरीप हंगामात सोयाबीन बियाणे तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे.त्या दृष्टीने विशेष काळजी घेणं गरजेचे असल्याचे मत प्रयोगशील शेतकरी उत्तम पुणे यांनी व्यक्त केले.

सद्याचे बाजार भाव बघता येत्या खरिपात सोयबीन पेरा वाढू शकतो.पण त्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होणे कठीण दिसते.देशात व राज्यात
मागील खरीप सोयाबीन कापणी वेळी अती वृष्टिने पीक खराब झाले.जे उत्पादन आले त्यातील अनेकांनी लगेच विक्री केले.
जागतिक बाजारात टंचाई, अमेरिका,अर्जेंटिना,ब्राझील येथील खराब व कोरडे हवामान यामुळे उत्पादन कमी येण्याचा अंदाज,कमी झालेले जुने साठे, भारतीय सोया डीओसि. ला वाढती मागणी यामुळे भारतातही कधी नव्हे इतके बाजार भाव वाढले.

बियाणे सावधगिरी…

मागील वर्षीचा अनुभव बघता खात्रीशीर कंपनीचे च बियाणे ओळखीच्या कृषी सेवा केंद्रातून घ्यावे. शक्यतो स्वतः जवळचे अगर  शेजारी गावातील शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेले   बियाणे घेऊन ठेवावे.योग्य ती रक्कम/किंमत त्वरित द्यावी.

उगवण क्षमता…

वेळेवर ,उशिरा जागे होण्यापेक्षा.. किती पेरणी करायची,किती बियाणे लागेल याचा अंदाज करून गावातील शेतकरी,कृषी सेवा केंद्र यांचे कडून विविध लॉट च्या १०० किंवा १० बिया आणून प्रत्येक्षात स्वतः चे शेतात, आत्ताच उगवण क्षमता तपासून बघा.१०० मध्ये ७० किंवा १० मध्ये ७ बिया अंकुरण होणे आवश्यक.
२०२० चे रब्बीत देखील हरभरा पेरा वाढणार ,बियाणे टंचाई व भाव वाढ निर्माण होईल यावर मी भाष्य केले होते.तसेच झाले.
सोयाबीन चे बाबत ही तेच घडण्याची चिन्ह स्पष्ट आहेत.७ हजार रु. वर  भाव गेलेत . तेव्हा बियाणे काय भाव असेल ? भाव काही असो. खात्रीशीर बियाणे मिळणे गरजेचे,नाहीतर गेल्या वेळ सारखं वेळ ,पैसा जाऊनही पेरणीची वेळ पुन्हा येत नाही. तेंव्हा स्वतः जवळचे ,गावातील शेतकऱ्याकडून गरजे इतके बियाण्याची तरतूद वेळीच करा. शेतकऱ्यांनो सोयाबीन बियाणे
शेतकरी..शेती प्रश्नाचे अभ्यासक.
उत्तम बादशहा पुणे.
बी.कॉम. एम.ए.(अर्थशास्त्र)
मो.न. ९९२२८२७६१३
मु.पो. ..ब्राम्हण गावं
तालुका..कोपरगाव
जिल्हा..अहमदनगर
दिनाक..१०/४/२०२१.
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *