खतांच्या नवीन किंमती जाहीर, कोणते खत किती रुपयांना मिळणार वाचा सविस्तर?

खतांच्या नवीन किंमती जाहीर, कोणते खत किती रुपयांना मिळणार वाचा सविस्तर?

 

खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता.

त्यामुळे मग फक्त DAPचीच दरवाढ कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते.

पण, आता सरकारनं DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहे.

खतांवरील अनुदानात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. यामुळे सगळ्याच कंपन्यांची DAP खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.

याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे.

केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. म्हणजेच खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.

2020-21मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलं होतं.

आता 2021-22च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फॉस्फेटसाठीचं अनुदान 14.888 रुपयांहून 45.32 रुपये करण्यात आलं आहे.

खतांचे नवीन दर

भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. यंदा यूरियाचे दर ‘जैसे थे’ म्हणजेच ठेवण्यात आले होते. यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळणार आहे.

आता आपण कंपनीनुसार खतांच्या इतर ग्रेड्सच्या किंमती जाणून घेऊया.

इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) नवीन खतांचे दर जाहीर केलेत.

कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2021पासून या नवीन दरानं खतांची विक्री केली जाणार आहे.

इफ्को कंपनीचे नवे दर

खताचा ग्रेड २०२१ साठीचे नवे दर (रुपये)
DPA 18-46-001200
NPK 10-26-261175
NPK 12-32-161185
NPS 20-20-0-13975

याशिवाय कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात असंही म्हटलंय की, बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दरानं विकण्यात येतील.

म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे, ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.

ADVENTZ ग्रूपअंतर्गत येणाऱ्या झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान या ब्रँड नावानं खत विक्री), मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (जय किसान मंगला या ब्रँड नावानं खत विक्री) आणि प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड (जय किसान नवरत्न या ब्रँड नावानं खत विक्री) या तिन्ही कंपन्यांचे त्यांचे नवीन दर जारी केले आहेत.

हे नवीन दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसंच या कंपन्यांनी जारी केलेल्या पत्रकात हेसुद्धा स्पष्ट केलंय की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दरानं विकण्यात येतील.

जय किसानच्या खतांचे दर

खताचा ग्रेड २०२१ साठीचे नवे दर (रुपये)
DPA 18-46-001200
NPK 10-26-261375
NPK 12-32-161310
NPK 19-19-191575
NPS 20-20-0-131090
NP 28-28-01475
NPK 14-35-141365

कोरोमंडल ही खत उत्पादक कंपनी ग्रोमोर या ब्रँड नावानं खताची विक्री करते.

कंपनीनं 20 मे 2021 पासून नवीन दर लागू केलेत. जुना स्टॉक किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची एमआरपी असेल तोसुद्धा या नवीन दरानेच विकावा, असंही सांगितलं आहे.

कोरोमंडलच्या खतांचे दर

खताचा ग्रेड २०२१ साठीचे नवे दर (रुपये)
DPA 18-46-001200
NPS 20-20-0-131050
NPS 16-20-0-131000
NPK 14-35-141400
NPK 10-26-261300
NP 28-28-0-01450
NPS 24-24-0-81500
NPKS 15-15-15-09 1150

महाधनच्या खतांचे दर

स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी ‘महाधन‘ या ब्रँडखाली खंतांची विक्री करते.

20 मे पासून खतांची नवीन दरानं विक्री होणार आहे.

खताचा ग्रेड २०२१ साठीचे नवे दर (रुपये)
24-24-001450
10-26-261390
12-32-161370
20-20-0-131150
14-28-00 1280

‘गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड’ ही कंपनी ‘सरदार’ या ब्रॅडच्या नावानं खतांची विक्री करते.

या कंपनीनं सुद्धा त्यांच्या खतांचे नवीन दर जाहीर केले आहेत.

सरदारच्या खतांचे दर

खताचा ग्रेड २०२१ साठीचे नवे दर (रुपये)
सरदार अमोनियम सल्फेट735
सरदार DPA1200
सरदार NPK  10-26-261175
सरदार NPK 12-32-161185
सरदार APS975

तक्रार कुठे करायची?

पण, समजा तुम्हाला तुमच्या भागात एखादा विक्रेता पूर्वीच्या ज्यादा दरानेच खत विकत असेल तर तुम्ही फोनद्वारे यासंबंधीची तक्रार करू शकता.

त्यासाठी कृषी विभागानं राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

याविषयी माहिती देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं, “कोरोना रोखण्यासाठी असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याच्या निवारणासाठी नियंत्रण दिलेल्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालयस्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. खतांच्या नवीन खतांच्या नवीन खतांच्या नवीन खतांच्या नवीन

त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 उपलब्ध करून देण्यात आला आहे.”

 संदर्भ:- BBC News Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *