Search
Generic filters

फुलशेतीचे विक्री व्यवस्थापन

फुलशेतीचे विक्री व्यवस्थापन

फुलशेतीचे उत्तम दर्जाच्या फुलांचे उत्पादन करणे आणि त्यास योग्य तो भाव मिळवणे हा शेतक-यांचा एक मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याचाच हातात असते पण योग्य तो भाव मिळणे याची शाश्वती नसते. बाजारभाव निश्चित होण्यासाठी बरीच कारणे आहेत. मुख्य ग्राहकांच्या हातात अंतिमतः कोणत्या गुणवत्तेची फुले मिळतात हे फुलांच्या काढणीपूर्व आणि काढणीपश्चात हाताळणीवर अवलंबून असते कारण फुले फार नाजूक असतात. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरते तसेच फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद व समाधान प्राप्त होते. फुले हा अतिशय नाशवंतमाल आहे. कारण ती फार नाजूक असतात. फुलांची काढणी करताना ती आपण मातृवृक्षापासून कापून अलग करतो. काढणी केलेली फुले ही अन्न, पाणी, क्षार आणि संजीवके यांच्यापासून फुलांच्या उत्पादनापैकी जवळजवळ ३० टक्के फुलांची नासाडी ही फक्त विक्री होऊन ग्राहकाच्या हाती फुले जाईपर्यंत त्याची गुणवत्ता व दर्जा टिकून ठेवण्यासाठी काढणीपश्चात फुलांची हाताळणी शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.चांगला बाजारभाव मिळण्यासाठी व काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल

फुलांच्या उत्पादनाची वेळ

फुलशेतीचे फुलांचे उत्पादन करण्यासाठी मार्केटचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. मार्केटमध्ये कोणत्या फुलांना कधी बाजारभाव उत्तम असतो त्यानुसार फुलांची लागवड करणे आणि योग्य त्या वेळी त्यांची विक्री करणे याचा अभ्यास करणे गरजेच आहे. भारतामध्ये फुलांचा वापर एका विशिष्ट पद्धतीने केला जातो. त्या तुलनेने पश्चात देशात फुलांचा वापर सरांस होतो. तेथे फुले ही त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग असून ताजी फुले घरामध्ये ठेवण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या समारंभामध्ये फुलांना फार महत्व आहे. त्यामानाने भारतात ही संस्कृती अजून रुजू होत आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या समारंभामध्ये फुलांचे महत्व वाढत आहे. अनेक प्रकारचे दिवस व सण भारतात साजरे होत आहेत आणि त्यासाठी आणि योग्यवेळी लागवड करून हवी तेव्हा फुले विक्रीसाठी तयार असतील तरच तुमचे विक्री व्यवस्थापन योग्य पद्धतीने होईल.

फुलांची काढणी

काढणीपश्चात फुलांचे आयुष्य हे अनेक बाबींवर अवलंबून असते. फुलांची काढणीपश्चात आयुष्य हे फुलांची जात व प्रजातीनुसार वेगवेगळे असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचे आनुवंशिक गुणधर्म होय. त्यामध्ये फुलपिकाची वाढ, शरीराची रचना, भौतिक, जैव-रासायनिक व आनुवंशिकबंध इत्यादी घटक येतात. फुलांचे काढणीपश्चात आयुष्य हे फुलदांड्यात/ कुमांत साठलेले कर्बोदकांचे प्रमाण, एकूण पाकळ्यांची संख्या, फुलांच्या देठाची लांबी व जाडी, झायलेम व फ्लोयमची कार्यक्षमता, प्रतिकारक्षमता, संजीवकांचे प्रमाण, पेशीजालाची तिव्रता, रोग व किडीला बळी पडण्याची क्षमता इ. गोष्टी कारणीभूत असतात. फुलांचे काढणीपश्चात आयुष्य हे खालील दोन बाबीवर परिणाम करतात. म्हणजे फुलांचे काढणीत्तयम आयुष्य हे पीक व्यवस्थापनेतील आणि हवामानातील घटकावर काढणीपश्चात फुलांचे आयुष्य कमी-जास्त होऊ शकते. फुले काढणीची वेळ, स्थिती व पद्धती यावर फुलांचे फुलदाणीतील सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर काढावीत. कमी तापमानात झाडांचा श्वसनाचा वेग कमी होऊन शरीरांतर्गत पाण्याचा विनियोग कमी होतो.

शक्यतो फुले ही संध्याकाळी काढण्याचा सल्ला दिला जातो. कारण दिवसभराच्या प्रकाशसंश्लेषनाच्या क्रियेने फुलदांड्यात भरपूर अन्नद्रव्ये साठली जातात. फुले काढणी केल्यानंतर ती लगेच पाणी अथवा फुलांचे संरक्षित करणाच्या काढणीसाठी धारदार सुरी अथवा सिकेटरचा उपयोग करावा. काढणी साह्याने तिरपा काप द्यावा, त्यामुळे दांड्याचा जास्तीतजास्त भाग उघडा होऊन दांडे भरपूर पाणी शोषून घेऊ शकतील. काढणी ही फुले/दांड्याची लांबी, फुलपिकाचा उपयोग व बाजारातील मागणी यावर अवलंबून ठेवावी. व पकृतेची लक्षणे वेगवेगळी असतात.

ग्रेडिंग आणि पॅकेजिंग

आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात. फक्त उत्पादनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्थरावर निर्धारित केलेल्या मानकानांचा काटेकोरपणे अवलंब करावा लागतो. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य ते मूल्य मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीने वर्गीकरण करणे गरजेचे असते. फुलोत्पादन करण्यासाठी जितकी पुष्पदांड्यांची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणे अत्यंत गरजेच असते. स्वच्छ पाणी, अवजारे (कात्री/कटर), फुले ठेवण्याची बादली/भांडे, इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्याअगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकाने अस्तित्वात आहेत व ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध आहेत. क्रोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर फुले जास्त अंतरावर पोचवण्यासाठी केला जातो. विविध आकारात लांबी-रुंदीचे बॉक्सेस बाजारात उपलब्ध आहेत, त्यानुसार व फुलांच्या प्रकाराप्रमाणे त्याची योग्य निवड करावी. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणे फायद्याचे असते.

santsahitya.in

Post Views: [views id="4943"]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *