Search
Generic filters

‘या’ फळबाग योजनेसाठी सरकार देतंय अनुदान

‘या’ फळबाग योजनेसाठी सरकार देतंय अनुदान  

 

योजनेचे नाव:- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

फळबागांची लागवड वाढावी म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ दिला जाणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते.

योजनेसाठी प्रमुख अटी :
● सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार केला जातो.
● लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थ्यांना देय नाही.
● शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ दिला जातो.
● 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
● परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
● इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येतो.

आवश्यक कागदपत्रे :
▪ आधार कार्ड
▪ 7/12 उतारा
▪ मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला

लाभाचे स्वरूप :
फळबागांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येते :
● आंबा कलमे : 53 हजार 561/-,
● आंबा कलमे (सधन लागवड) : 1 लाख 1 हजार,972 /-
● काजू कलमे : 55,578/-
● पेरू कलमे (सधन लागवड) : 20,2090/-
● पेरू कलमे : 62,253/-
● डाळिंब कलमे : 1,09,487/-
● संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे : 62,578/-
● संत्रा कलमे : 99,716/-
● नारळ रोपे वानावली : 59,622/-
● नारळ रोपे टी/डी : 65,022/-
● सीताफळ कलमे : 72,531/-
● आवळा कलमे : 49,735/-
● चिंच कलमे : 47,321/-
● जांभूळ कलमे : 47,321/-
● कोकम कलमे : 47,260/-
● फणस कलमे : 43,596/-
● अंजीर कलमे : 97,406/-
● चिकू कलमे : 52,061/-

संकेतस्थळ :http://www.krishi.maharashtra.gov.in

या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

कृषीक्रांतीवर करा शेतीसंबंधित मोफत जाहिरात खालील लिंकवर जाऊन जाहिरात टाका 

https://www.krushikranti.com/publish-advertisement/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “‘या’ फळबाग योजनेसाठी सरकार देतंय अनुदान”

  1. शतावरी लागवडीची संपूर्ण माहिती मार्केट ची संपूर्ण माहिती खालील इमेल पत्त्यावर कळवावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *