Search
Generic filters

सरकारच्यावतीने शेळीपालनासाठी नवी योजना, ‘या’ लोकांना मिळणार लाभ

मोठी कमाई देणाऱ्या शेळ्याच्या 'या' पाच जाती

सरकारच्यावतीने शेळीपालनासाठी नवी योजना, ‘या’ लोकांना मिळणार लाभ

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकरी वर्गासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. त्यादृष्टीनेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळीपालन प्रकल्पाकरिता नवीन स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत याबाबत माहिती दिलीय. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजूर यांना शेळीपालन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये मागासवर्गीय ऊसतोड मजूर लाभार्थ्यांची निवड ही मर्यादित असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहतात, याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने स्वतंत्र महिला बचत गटांकरिता नवीन योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येणारी ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखाली आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून राबविण्यात येणार आहे.

क्षेत्रीय स्तरावर पशुधन अधिकारी हे काम पाहतील. पशुसंवर्धन विभाग आणि सामाजिक न्याय विभाग संयुक्तपणे लाभार्थ्यांची निवड करतील. ही योजना सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले

santsahitya

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “सरकारच्यावतीने शेळीपालनासाठी नवी योजना, ‘या’ लोकांना मिळणार लाभ”

  1. गोवर्धन कार्ले

    शेवगा लागवड करावयाची आहे कोणता शेवगा लावावा तसेच कोणती जात निवडावी शेवगा लागवड कधी करावी

  2. Santosh khandu kandhare

    मला शेळी पालनासाठी लोन पाहिजे नाव- संतोष कंधारे मो.9665610091

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *