Search
Generic filters

Gulab chakri vadal : गुलाब चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Gulab chakri vadal : गुलाब चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Gulab chakri vadal : गुलाब चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा  आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं  धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचा प्रभाव पुढील 48 तास राज्यावर पाहायला मिळणार आहे.

इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. येत्या 24 तासात,मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.

पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.

रेड अलर्ट (Red alert)

पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट (Yellow Alert)

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 Marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *