Search
Generic filters

Harbhara Rate : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

Harbhara Rate : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

Harbhara Rate : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

 

रब्बी हंगामात कृषी विभागाचा कल आणि शेतकऱ्यांचा जोर हरभरा पेरणीवरच होता. यंदा अधिकच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या त्यामुळे ज्वारीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरच भर दिला होता. केवळ महाराष्ट्रातच सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र, पेरणी होऊन महिन्याभराचाच कालावधी लोटला असताना आता शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे ती, दराची. कारण हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून सध्या हमीभावापेक्षाही दर कमी आहे. शिवाय नाफेडनेही आवक केली असून उत्पादन वाढले तरी नाफेड किती प्रमाणात हमीभावाने हरभरा खरेदी करते त्यावरच दर अवलंबून आहेत. यापूर्वी खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या दराची चिंता होती आता रब्बीतील मुख्य पिकाची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिलेले आहे.

हरभरा दरात घट

हरभरा पेरणीनंतर त्याचे दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिकचे असतात. यंदा मात्र, पेरा पूर्ण झाला तरी हरभऱ्याचे दर हे कमीच आहेत. शिवाय हरभऱ्याच्या आयातीमुळे सणासुदीमध्ये देखील हरभराला मागणी नव्हती. सरासरीएवढ्या क्षेत्रात हरभरा लागवड झाली असली तरी सध्याचे दर हे हमीभावापेक्षाही कमीच आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी 5 हजार 900 पर्यंत दर गेले होते. मात्र, सध्या 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपये दर आहे. त्यामुळे हरभरा अजून वावरातच असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये 7 ते 8 टक्क्यांनी दर हे घटलेले आहेत. आता आयात, नाफेड कडील साठा आणि आता नव्याने येणारे उत्पादन याचा नेमका काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

 हे पण वाचा:- थकबाकीदारांना माफी, नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

हरभरा आयात, नाफेडकडील साठा अन् होणारे उत्पादन

केंद्र सरकारची धोरणे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात राहिलेली आहेत. नेमके उत्पादन बाजारात येणार त्याच दरम्यान संबंधित शेतीमालाची आवक केली जात आहे. आता हरभरा पिकाचीही तीच अवस्था आहे. नाफेडकडे मोठ्या प्रमाणात हरभरा साठवणूक करण्यात आला आहे. असे असताना पुन्हा आयात ही सुरुच आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक पेरा हा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे नुकसान झाले तर आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांचे होणार आहे. आता सध्या ठरविण्यात आलेल्या आधारभूत दरापेक्षा कमी दर हा बाजारपेठेत आहे. मात्र, उद्या जर नाफेडने हरभरा खरेदीबीबत धोरणच बदलले तर मात्र, मोठा फटका हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

रब्बी हंगामात काय आहे स्थिती?

ज्वारी आणि गहू हीच मुख्य पिके होती रब्बी हंगामातील. काळाच्या ओघात उत्पादनवाढीसाठी पीकपध्दतीमध्ये बदल होत आहे. आता नगदी पीक म्हणून हरभराकडे पाहिले जाते. केंद्र सरकारच्या आकवारीनुसार 97 लाख हेक्टरावर पेरा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांमध्ये विक्रमी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये हरभरा पिकापेक्षा मोहरीला अधिक पसंती दिली आहे. शिवाय उत्पादनाची हमी असल्याने शेतकरी हे धाडस करीत आहेत.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

source:- tv9 marati

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *