Weather today : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Weather today : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Weather today : राज्यात आज पाऊस कुठं होणार? हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे

भारतीय हवामान विभागानं राज्यात नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटाच्या भागात पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, असंही सांगण्यात आलं आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिलेला नाही.

राज्यात कुठं पाऊस होणारं

प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं राज्यात आज नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, महाराष्ट्रात दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल. त्यामुळे पूर आणि दरडग्रस्त भागात मदत कार्य करण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा:- ढगफुटी ची माहिती मराठी , ढगफुटी ची कारणे जाणून घ्या संपूर्ण माहिती

पुढील चार दिवस यलो अ‌ॅलर्ट

25 जुलैसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईला दिलासा

राज्यातील पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अदाज जारी करताना हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अ‌ॅलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

हे पण वाचा:- ड्रॅगन फ्रुट अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज , वाचा सविस्तर!

28 जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा क्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल.मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

source:- TV9 Marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व