Weather Alert : मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाची शक्यता!

Weather Alert : मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाची शक्यता!

Weather Alert : मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाची शक्यता!

 

पुणे (Pune) : कोकणातील अनेक भागांत पावसाने (Rain) जोर धरला आहे. कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. उर्वरित भागात पावसाने उसंत घेतली आहे. आज (ता.१८) कोकणात सर्वत्र, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह मराठवाड्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. तसेच अरबी समुद्राचा उत्तर भाग ते आंध्र प्रदेशचा किनारपट्टी दरम्यान पूर्व – पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा उत्तर महाराष्ट्र आणि तेलंगानापर्यत असून समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय महाराष्ट्राची किनारपट्टी ते कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या पट्याची द्रोणीय स्थिती आहे.

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

यामुळे अरबी समुद्राकडून बाष्प खेचले जात असल्याने कोकणातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे कोकणात जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

येथे होणार जोरदार पाऊस (It will rain heavily here)

 

  • रविवार:- संपूर्ण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद
  • सोमवार:- संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ
  • मंगळवार:- संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, भंडारा, नागपूर
  • बुधवार:-  संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली

वाढ

पुणे – २८.६ (०.५)

जळगाव – ३२.५

कोल्हापूर – २६.२ (-०.६)

महाबळेश्वर – २०.१ (-०.३)

मालेगाव – ३३.४ (२.६)

नाशिक – २९.९ (१.४)

सांगली – २७.७ (-१.२)

सातारा – २८.३ (१.४)

सोलापूर – ३०.८ (-०.९)

मुंबई (कुलाबा) – २९.६ (-०.२)

अलिबाग – ३०.१ (०.१)

रत्नागिरी – २८.४ (-०.६)

डहाणू – ३०.४ (-०.१)

औरंगाबाद – ३१.२ (१.१)

परभणी – ३१.७ (०.१)

नांदेड – ३१.५ (-१.१)

अकोला – ३३.८ (१.६)

अमरावती – ३२.० (१.६)

बुलडाणा – ३१.६ (२.९)

ब्रम्हपुरी – ३५.८ (५.२)

चंद्रपूर – ३१.६ (०.१)

गोंदिया – ३३.६ (२.२)

नागपूर – ३२.६ (१.१)

वर्धा – ३३.४ (१.८)

संदर्भ:- ऍग्रोवन

हे पण वाचा:- मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे?

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *